ब्रेकींग न्यूज… — युवकाला ट्रॅक्टर कॅजविलची धडक,जागीच मृत्यू…

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

       कुरखेडा नजीकच्या वाकडी रस्त्यांवर कॅजविल लावलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत मनीष लोहंबरे वय २४ वर्षे या युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी ८.३० च्या दरम्यान घडली. 

        युवकाचे धाबेकर चौकात किराणा दुकान होते.त्याच्या अपघाती मृत्यू मुळे गावातील व परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.

          उमदा तरुण अपघातात मृत्यू पावल्याने कुटूंबातील सदस्य शोकाकुल झाले आहेत.