इतिहासतज्ञ ॲड.नाजीमभाई शेख यांचा आळंदीकरांकडून मानपत्र देऊन गौरव…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : श्री क्षेत्र आळंदी येथील अनेक पुरातन जलस्रोतांचा शोध लावून त्यांचे नुतनीकरण करण्यासाठी ज्यांनी अभ्यासपूर्वक काम केले असे तरुण वर्गाचे प्रेरणास्रोत इतिहासतज्ञ ॲड.नाजीमभाई शेख यांना आळंदीकरांकडून विशेषतः जय गणेश ग्रुप आणि जय गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या ५१व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हे मानपत्र जय गणेश ग्रुपचे अध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते तसेच माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांच्या अध्यक्षतेखाली देऊन गौरविण्यात आले. यावेळी उद्योजक चेतन कुऱ्हाडे, जनसेवक सागर उर्फ गोविंदशेठ कुऱ्हाडे, आनंद वडगावकर, निसार सय्यद, सुलतान शेख, विठ्ठल शिंदे, डॉ.सुनिल वाघमारे, अरुण बडगुजर, गौतम पाटोळे उपस्थित होते.

      ॲड.नाजीमभाई शेख हे एक विधीतज्ञ असुन माऊलींचे निस्सीम भक्त आहे त्यांनी आळंदीतील अनेक पुरातन विषयावर अभ्यास केला असुन तसेच आळंदी क्षेत्रात अनेक जलस्रोत असल्याचे ग्रंथातून माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला आहे, ते जलस्रोत विकसित व्हावे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत, अनेक तरुणांना ते प्रेरणादायी विचार देऊन प्रबोधन करत आहेत, त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन अनेक मानाचे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.