युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
माहेरी राहत असलेल्या विवाहीत महिलेला आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या व तीन महिन्यापासून फरार असलेल्या पतीस खल्लार पोलिसांनी अटक केली आहे.
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील सांगवा येथे दि 4 मार्चला सकाळच्या सुमारास श्रद्धा इंगोले या महिलेने आईच्या घरी पतीच्या रागावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याबाबत मृतकाची आई पुष्पा लोणारे यांनी पंकज प्रकाश इंगोले रा. कैलास नगर अकोला याच्या विरुध्द खल्लार पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिस आरोपी पंकज प्रकाश इंगोले विरुध्द कलम 80(1),(2),85,108(3),(5) बि एन एस नुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पंकज इंगोले हा फरार होता. मागिल तीन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीचा खल्लार पोलिसांनी अखेर शोध घेऊन त्यास अटक केली आहे.



