क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नेचर फाउंडेशन अभ्यासिका येथे साजरी‌‌.. 

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी

चिमूर:-

         नेचर फाउंडेशन अभ्यासिका चिमूर, येथे दि.11 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले याची जयंती साजरी करण्यात आली .    

             या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख म्हणून निशा चौधरी ताई व. विष्णू सावसाकडे, निकील मोडक सुमित हुलके यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

                        

               स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. “मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तावा, ज्योती म्हणे..

               स्त्रीशिक्षणाला चालना देणारे पहिले शिक्षक, ज्यांनी अनेक अशा समाजसाठी घातक असणाऱ्या चालीरीती बंद केल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती साजरी करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी अनेक कामे केली पण काही समाजातील लोक हे त्यांना जाती जातींनी त्यांना आता वाटून घेत आहे.

    या कार्यक्रमाला उपस्थित नेचर फाउंडेशन अभ्यासिकाचे सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.