सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली -सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे आज महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी ज जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्योलन करून माल्यार्पण करण्यात आले.

      त्याप्रसंगी ग्रामपंचायत एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे, उपसरपंच रिगण राऊत, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, वैभव खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. कुंदा जांभुळकर, रहिल्या कोचे, आशा बडवाईक, विभा तरोने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोजभाऊ कोटांगले, सुमेध बुद्ध विहार समिती अध्यक्ष मिथुन जांभुळकर, उपाध्यक्ष सुबोधकांत कोटांगले, सचिव कार्तिक मेश्राम, रामभाऊ मेश्राम, एकनाथ मेश्राम, बाबुराव जांभुळकर, शैलेश भैसारे, पुष्पा मेश्राम, सोनाली कोटांगले यांनी सहकार्य केले.