नंदलाल पाटील कापगते विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

      साकोली -नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे आयुष्यभर बहुजनांचे दुःख वेचण्याचे काम करणारे , क्रांतीसुर्य,थोर विचारवंत ,समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.

         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी.एस.बोरकर सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका स्वाती गहाणे मॅडम, प्रा. बी.पी.बोरकर सर, प्रा. के.जी.लोथे सर, सौ आर.बी.कापगते मॅडम सी.जी.झोडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

        कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून करण्यात आले.

        याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राध्यापक के.जी.लोथे सर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले समाजसुधारक महात्मा फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य, व जातीभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्न केला. पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षकेची जबाबदारी सावित्रीबाई वर सोपवली.”शेतकऱ्यांचा आसूड” या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दूर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली. अशा अनेक मुद्द्यांवर हात घालून सविस्तर असे मौलिक विचार ठेवले.

        तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डी एस बोरकर सर यांनी महात्मा फुले हे “नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे” फुलेंच्या कार्यातून धडा घेत शिक्षण हाच मूलमंत्र आहे. तळागाळातील समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे अविरतपणे समाज कार्य करणारे महात्मा फुले हे सूर्यासारखे नेहमी समाजासाठी आदर्श राहतील असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आपले विचार ठेवले. 

          याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित गीत, भाषणे सादर केले. 

           कार्यक्रमाचे संचालन आर व्ही दिघोरे यांनी तर आभार प्रदर्शन डी.डी.तुमसरे यांनी केले. 

         कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांनी सहकार्य केले.