Home Social काग ते नंदारा पांदन रस्ता केलाय जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर… — अशिद मेश्राम...

काग ते नंदारा पांदन रस्ता केलाय जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर… — अशिद मेश्राम यांच्या संघर्षाला आले यश!

शुभम गजभिये

   विशेष प्रतिनिधी..

      गेल्या तीन ते चार वर्षांपासून चिमूर नगर परिषद अंतर्गत काग प्रभाग क्रं १० काग ते नंदारा पांदन रस्त्याच्या विकास कामासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अशिद मेश्राम यांनी सतत पाठपुरावा केलाय.

        सन २०२३ रोजी काग ते नंदारा पाणंद रस्त्यावर गेली १० ते १२ दिवस आंदोलन सुद्धा केले.या आंदोलनाची दखल घेत विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी काग ते नंदारा पाणंद रस्त्याच्या विकास कामासाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ३०.०० लक्ष रु.निधी मंजूर करून दिला.

          आज दि,११ फेब्रुवारी २०२६ रोजी सौ.गीताताई लिंगायत नगराध्यक्ष न.प.चिमूर,अशिद मेश्राम, दिगंबर बेंडे नगरसेवक,सौ.निता लांडगे नगरसेवक,निखिल कारेकर यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात करण्याबाबत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

          यावेळी काग येथील ग्रामवाशिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.