शिवसेना (शिंदे गट) शाखेची कार्यकारिणी गठित….

ऋषी सहारे

   संपादक

      शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी ना.शिंदे सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या महिला सक्षमिकरण, बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम बनविण्यासाठी सरकार सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे संदीप बरडे शिवसेना संपर्क प्रमुख यांनी सांगितले.

         वर्षा जितेंद्र मोरे यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या,ना.एकनाथ शिंदे म्हणजे “प्रगती आणि विश्वास” असल्यामुळे,यांच्या पाठीशी, आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आरमोरी क्षेत्रातील महिलांनी त्यांचे अभिनंदन केले.

         या कार्यक्रमाला नारायण धकाते शिवसेना आरमोरी विधानसभा क्षेत्र प्रमुख,संतोष गोंदोळे शिवसेना आरमोरी विधानसभा संघटक, राकेश बैस शिवसेना आरमोरी विधानसभा क्षेत्र समन्वयक, अर्चना संतोष गोंदोळे शिवसेना आरमोरी विधानसभा महिला जिल्हा प्रमुख,अंकिता जोंजाळकर आरमोरी शिवसेना महिला शहर प्रमुख, राजेंद्र दिवटे शिवसेना उपतालुका प्रमुख,जयंत गोंदोळे आरमोरी शिवसेना शहर प्रमुख यासंह आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.