शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सुटणार… — अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलनाचे फलित…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

 अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषदेवर नुकतीच धडक देत विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण पाटील, जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस सुभाष सहारे यांच्या नेतृत्वात नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले. 

          त्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती यांचे सूचनेनुसार ज्या मागण्याकरिता धरणे देण्यात आले होते. त्या मागण्या पूर्ण करण्याकरिता तत्वतः मान्यता देण्यात आली आणि संघटनेला चर्चे करिता बोलावण्यात येईल असे कार्यालयाचे वतीने गजाला खान उपशिक्षणाधिकारी, गंगाधर मोहने विस्तार अधिकारी शिक्षण संजय मुंद्रे स.प्र.अधिकारी, प्रवीण जिचकार अधिक्षक, राहुल काळमेघ यांनी स्वतः धरणे मंडपाला भेट देवून आश्वस्त केले.

          धरणे आंदोलनातील मागण्यांमध्ये विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि विषय शिक्षक ह्या पदावर पदोन्नती करावी. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करावी, यासह प्राथमिक शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांमध्ये निवडश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात यावा. पात्र शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, याशिवाय शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय देयके, विषय शिक्षकांना ४३०० रूपये ग्रेड-पे लावण्यात यावा. २०१९ पासून प्रलंबित भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात याव्या. सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीस मान्यता देण्यात यावी. समग्र शिक्षा अभियानाचे अनुदान वेळेत जमा करण्यात यावे. सेवानिवृत्त शिक्षकांचे सर्व प्रकारचे लाभ वेळेत अदा करण्यात यावेत. सहाव्या टप्प्यातील बदली रद्द झालेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून कार्यमुक्त करण्यात यावे.

‌             या आंदोलनास शिक्षक भारती (प्राथमिक), डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र जूनी पेंशन संघटना आणि बहुजन शिक्षक महासंघ, प्राथमिक शिक्षक महामंडळ यांनी पाठिंबा दिलेला होता.

          आंदोलनात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण पाटील,जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी सरचिटणीस सुभाष सहारे, कार्याध्यक्ष संजय साखरे, कोषाध्यक्ष अशोक चव्हाण, राजाभाऊ होले, पंडितराव देशमुख, निळकंठ यावले, महीला आघाडी अध्यक्ष सुनिता पाटील, सरचिटणीस वृषाली देशमुख, सतीश गुजरकर, सूरज मंडे, प्रमोद घाटोड, प्रशांत भगेवार, गजानन निर्मळ, राजेंद्र तामस्कर, मंगेश खेरडे, गौरव काळे, मनोज चोरपगार, प्रभाकर झोड, संजय नागे, संजय वाटाणे, भूषण ठाकूर, प्रमोद ठाकरे, नामदेवराव ठाकरे, विनोद खाकसे, शकील अहमद, राजू पानतावणे, प्रमोद मांडवगणे, उज्ज्वल पंचवटे, भूषण बागडे, निखिल पाचघरे, श्री. बालपांडे, महेंद्र हीवे, संदीप खडेकर, प्रविण खरबडे, जितेन्द्र गहेरवार, प्रफुल्ल ढोरे, राजेश मुंधडा, साहेबराव परतेती, संदीप घाटे, रविकिरण सदाशिव, अरविंद महल्ले, प्रफुल्ल भोरे, प्रविण शेंद्रे, संदीप देशमुख, विजय पवार, अमोल पोकळे, अरुण चव्हाण, राजेंद्र सावरकर, मदन उमक, सुधीर नितनवरे, मंगेश वाघमारे, कमलाकर कदम, विकास रेखाते, ब्रम्हानंद कडू, दिनेश हेड, डिगाबर जामनिक, सुरेंद्र विघे, किशोर रुपनारायण, प्रदीप गणोरकर, दिनेश नगरकर, देवराव अमोदे, नितीन पेढेकर, श्री.मनोहरे, अण्णा कडू, श्री नीचीत, कांचन कडू, अनिल खिराडकर, विठ्ठल तलांडे, गाविल देशमुख, ओंकार राऊत, देविसिग चव्हाण, शशिकांत डहाके, राजेंद्र कैथवास, प्रशांत गुल्हाने यांच्यासह अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ,शिक्षक भारती (प्राथमिक) , डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र जूनी पेंशन संघटनेना बहुजन शिक्षक महासंघ आणि जिल्ह्यातील पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.