भाजप युवा मोर्चा सरचिटणीस पदी ॲड.आकाश जोशी यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

आळंदी : येथील भाजपचे युवा मोर्चा माजी अध्यक्ष ॲड.आकाश जोशी यांची खेड तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदेश जाधव यांनी त्यांना निवडपत्र दिले आहे. 

         यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, प्रदेश उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे, रवींद्र भेगडे, सरचिटणीस संजय रौंधळ, जिल्हा उपाध्यक्ष काळुराम पिंजन आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. ॲड.जोशी हे भाजपचे क्रियाशील पदाधिकारी आहेत. भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याची पक्षीय पातळीवर दखल घेत त्यांची सरचिटणीसपदी नेमणूक केली आहे.

          माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचे, त्या दिलेल्या संधीचे सोने करून दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडीन. भाजपा युवा मोर्चाचे कार्य तालुक्‍यात प्रभावीपणे करून भाजपा युवा मोर्चाची ताकद तालुक्यात निश्चितपणे वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करीन असे नवनिर्वाचित तालुका सरचिटणीस ॲड.आकाश जोशी यांनी सांगितले आहे.