Home Maharashtra आळंदीत इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच…

आळंदीत इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वरांची पावन इंद्रायणी नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे. आळंदीत इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळून आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता पसरली असून, ‘इंद्रायणीचे पावित्र्य जोपासावे’ अशी मागणी जोर धरू लागली आहे.

      नदीत सांडपाणी, धार्मिक कचरा आणि रासायनिक प्रदूषण यामुळे प्राणवायूची कमतरता निर्माण होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिणामी जलचरांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.

       नगरपालिकेने सर्वेक्षण करून प्रदूषणाचे मूळ कारण शोधावे, दोषींवर कारवाई करून नदीतील सांडपाण्याचे प्रमाण तातडीने रोखावे, अशी जनतेची मागणी आहे.

        दरवर्षी लाखो भाविकांची आस्था असलेल्या या पवित्र नदीचे रक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून इंद्रायणीचे पावित्र्य पुन्हा बहाल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.