आळंदीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जाहीर निषेध…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाले असताना धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळत आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पालकमंत्री विखेंवर भंडारा उधळणाऱ्या आंदोलकाला भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे व सहकाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडवल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

        आळंदी मध्ये या घटनेचे पडसाद उमटले असून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान व सकल धनगर समाज यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भागवत काटकर, बाळासाहेब कवलासे, प्रकाश बनकर, रामदास चिंचले, लिंबाजी ढाके, बाळासाहेब वायकुळे, ओंकार महाराज वैद्य, लक्ष्मण शिंदे, श्रीराम गडदे, गणेश काळे, प्रवीण मस्के, बाळासाहेब खांडेकर, रेवन दिवटे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         यावेळी भागवत काटकर यांनी सांगितले की आपल्या धनगर समजाच्या बांधवावर मल्हारी मार्तंड खंडोबाचा भंडारा टाकला म्हणुन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण करून महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अपमान केला त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो, यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विशेष अधिवेशन बोलून धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.