शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरूमगाव येथे प्रेरणादायी मार्गदर्शन… 

 

भाविक करमनकर

भानोरा तालुका प्रतिनिधी

 

दि. 9 सप्टेंबर 2023 शनिवारला शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरूमगाव येथे शुभम महादेव उईके यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शुभम उईके हे पी एच सी मुरूमगाव, उपकेंद्र उमरपाल येथे आरोग्य सेवक पदावर कार्यरत आहेत.

त्यांनी पदविचं शिक्षण घेऊन स्टेट लेव्हल चे थाळीफेक या खेळामध्ये सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहे. विशेष म्हणजे ते शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रामगड चे माजी विद्यार्थी असून त्यांना आश्रमशाळेतील विद्यार्थ्याप्रति भावनिक जिव्हाळा आहे. ते रोज सकाळी आश्रमशाळा मुरूमगाव येथे विद्यार्थ्यांना निशुल्क विविध खेळांचे प्रशिक्षणही देतात.

त्यांचा अजूनही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू असून शाळेतील विद्यार्थ्यांनीही कठीण परिश्रम घेऊन मोठं व्हावं व आपल्या शाळेचे व आईवडिलांचे नाव मोठं करावं याबाबत सूतोवाच केलं. त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी व मराठी अशा तिन्ही भाषेमधून प्रेरित करतांना संगीतलं की विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत व ते पूर्ण करण्याची पंचसूत्रीही सांगितली. अपयश कसं पचवावं व पुन्हा नव्याने कशी सुरुवात करायची हे स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांवरून सांगितलं.

पौगंडावस्थेत ध्येयप्राप्तीच्या मार्गात प्रेम व इतर भावनिक बाबींचा कसा सामना करायचा याविषयीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. अभ्यासातील अडचणी सोडवायच्या असतील तर शिक्षकांना न घाबरता प्रश्न विचारले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वातून त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची प्रतीची विद्यार्थ्यांना आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका कु डी वाय मेश्राम मॅडम यांनी मुलांना शुभम उईके यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेऊन चिकाटीने अभ्यास करण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जी डी हर्षे सर तर आभार बी ए जायभाये सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक एस आर भालेकर सर, अधिक्षिका कु के व्ही कांबळे मॅडम, शिक्षकवृंद कु एस एम पेदापल्ली मॅडम, कु टी आर भोयर मॅडम, कु जयश्री वासनिक मॅडम, नागेश निसार सर, के जी घोसरे सर, आर जी माहुलकर सर, शिपाई पी एम कोचे यांनी सहकार्य केलं.