अरमान बारसागडे
तालुका प्रतिनिधी चिमूर
दखल न्यूज भारत
चिमूर – शहरातील साचलेल्या गढूळ व दूषित पाण्यात कोथिंबीर धुताना एका महिला भाजीपाला विक्रेत्यांचा व्हिडिओ वायरल झाल्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे. सदर व्हिडिओ वर नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
चिमूर शहरात दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो, सद्ध्या चिमूर शहरातून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याचे खोदकाम केले असून, खोदकाम केलेल्या ठिकाणी बराच गढूळ पाणी साचलेला आहे. शुक्रवारी एका भाजीपाला विक्रेत्या महिलेने विक्रीसाठी खरेदी केलेली कोथिंबीर त्या गढूळ व दूषित पाण्यात धुवून स्वतःच्या भाजीपाला दुकानात विक्रीसाठी ठेवणार होती. तत्पूर्वी ते कोथिंबीर साचलेल्या गढूळ व दूषित पाण्यात धुत असतानाचा त्या महिलेचा व्हिडिओ कुणीतरी समाजमाध्यमांवर वायरल केला.