पोलिसांचा धडाक्यात देशी दारू विक्रेता ताब्यात…

ऋषी सहारे

संपादक

अगामी गणेशोत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारू विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक ०९/०९/२०२३ रोजी पो.शि. ४०३२ सराटे पो.स्टे देसाईगंज यांना खात्रीशीर बातमीदाराकडून दुचाकी वाहनाने मौजा आंबेडकर वार्ड, बुध्द विहाराचे समोरील रोडने अवैद्यरित्या देशी दारूची वाहतुक करणार आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार ढोके असे सापळा रचून इसम नामे योगेश्वर सुनिल गेडाम वय २४ वर्षे रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली यास पकडले व त्याचे ताब्यातून १) अॅक्टीव्हा काळया रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ३३ वाय २०६७ किं.अं ७००००/- रू. २) देशी दारु संत्री कंपनीच्या ९० मि.ली. मापाच्या प्लॅस्टीकच्या २०० नग सिलबंद बॉटल किं.अं. १६००० /- रु. ३) विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० मि.ली. मापाच्या काचेच्या ७२ निपा त्याची किं.अं. २१६००/- असा एकुण १०७६००/- रु. किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करित आहेत.