Home Maharashtra बल्लारपूर शहरातील वाहतूक कोंडी जिवघेणी… — मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करा व...

बल्लारपूर शहरातील वाहतूक कोंडी जिवघेणी… — मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करा व अतिक्रमण थांबवा,बैठकीतील सुर!..   — आम आदमी पक्षासोबत सर्व विभागांची संयुक्त बैठक संपन्न…

   अमान क़ुरैशी 

चंद्रपुर जिल्ह्य प्रतिनिधी 

    दखल न्यूज़ भारत

बल्लारपूर :- दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ शहरात वाढत्या वाहतूकीची कोंडी,मोकाट जनावरे आणि अतिक्रमणाच्या समस्या सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांचे अधिकारी आणि आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर समिती यांची संयुक्त बैठक नुकतीच संपन्न झाली.

बैठकीतील ठळक मुद्दे…

        १) महामार्गावरील अवजड वाहनांची दहशत शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या महामार्गावर BILT,फॉरेस्ट, FDCM आणि WCL यांसारख्या कंपन्यांमुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होते.ही वाहने वेगमर्यादा पाळत नाहीत व शहरात मनमानीपणे धावत असतात.

      २) AAP शहराध्यक्ष रवी पुप्पलवार यांनी सकाळी ६ ते ९, दुपारी ११ ते १ आणि संध्याकाळी ३ ते ८ या वेळेत अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली.

        ३) मोकाट जनावरांचा वाढता त्रास,रस्त्याच्या कडेला व दुभाजकावर मोठ्या प्रमाणात गाई व कुत्र्यांचा वावर असल्याने अपघातांचा धोका वाढतो आहे.

       ४) नगरपालिकेकडून जनावरे पकडण्यासाठी निविदा काढूनही प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

        ५) शहरात शेकडो मोकाट जनावरे असताना फक्त ३० गाईंसाठी कानजी व कुत्र्यांसाठी फक्त ३ शेल्टर आहेत.पुप्पलवार यांनी अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करून आवश्यकतेनुसार कानजी व शेल्टर उभारण्याची मागणी केली.तोपर्यंत बचत भवन कानजीसाठी वापरण्याचे सुचवले.

नगरपालिकेच्या दुहेरी भूमिकेवर टीका..‌.

      हातगाडीवाल्यांवर अतिक्रमण केले असल्याने कारवाई केली जाते,मात्र महामार्गावरील मोठे व्यापारी व पार्किंग नसलेल्या कॉम्प्लेक्सवर कारवाई शून्य.

वादाचे मुद्दे व पुढील मागणी…

      बैठकीदरम्यान तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी व्हिडिओ काढण्यास मनाई केल्याने पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

       तसेच,ठोस निर्णय किंवा आदेश न घेता बैठक संपल्याबद्दल आम आदमी पार्टीने नाराजी व्यक्त केली असून,बैठकीचे कार्यवृत्त तसेच विभागांना दिलेले निर्देश/आदेश यांची सत्यप्रत सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

      या बैठकीत उपविभागीय अधिकारी तिवारी मॅडम,तहसीलदार कोकाटे मॅडम,उपमुख्याधिकारी उमरे,स्वच्छता निरीक्षक गेडाम,बांधकाम विभाग अभियंता तिवारी आणि जोशी,एपीआय गायकवाड, शमोकाट कुत्री पकडण्याचे कंत्राटदार श्रुती लोणारे,मोकाट गुरे पकडण्याचे कंत्राटदार येल्लय्या दासरप,पेपरमील व्यवस्थापन प्रतिनिधी तसेच वनविभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.(जबाबदार अधिकारी/कर्मचारी)