शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
ग्रा.पं.महादवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टाकी मध्ये दुषित पाणी येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे.या दुषीत पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम पडण्याची शक्यता आहे.
यामुळे मौजा महादवाडी येथे आरो प्लाॅन्ट बसवून देण्यासंबंधाने गट विकास अधिकारी चिमूर व उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चिमूर यांना सरपंच भोजराज कामडी व ग्रामसेवक यांनी पत्रव्यवहार केला आहे.
गटविकास अधिकारी चिमूर व उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चिमूर यांना सरपंच ग्रा.पं. महादवाडी यांनी तक्रार अर्ज दि.24/07/2025 ला दिलेला आहे.
ग्रा.पं.महादवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकी मध्ये दुषित पाणी येत असल्याबाबतची तक्रार सरपंच यांनी पं.स.चिमूर येथे केलेली आहे.
तसेच प्रत्यक्ष भेटी दरम्यान पाहणी केली असता पाणी गढूळ आढळून आले.याबाबत गटविकास अधिकारी यांना वारंवार सूचना देण्यात आलेली आहे.गावात अतिशय दुषित पाणी येत असून त्या पाण्यापासून साथीच्या रोगाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही याची कल्पनाही गटविकास अधिकाऱ्यांना दिली आहे.
तसेच उपविभागीय अभियंता,ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिमुर यांना मौजा महादवाडी येथे जिल्हा विकास योजना निधी अंतर्गत आरो प्लांट बसवुन देणेबाबत विनंती करण्यात आली आहे.
आरो प्लाॅन्ट बसवून देण्यासंबंधाने चिमूर येथील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने मौजा महादवाडी ग्रामसभेत आरो प्लाॅन्ट बाबत विशेष चर्चा करण्यात आली.
जिल्हा विकास योजना निधी अंतर्गत सन २०२५-२०२६ मध्ये मौजा महादवाडी आरो प्लाॅन्ट बसविण्यात येणे बाबत ग्रामसभेची मंजुरी घेण्यात आली.



