ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : त्रिरत्न बुद्ध विहार आलेबेदर येथे आषाढ पौर्णिमा वर्षवास निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये विजय नंदागवळी माजी सहा.वाहतूक अधीक्षक यांचे कडून पूज्य भन्ते नागसेन यांना फळदान करण्यात आले आणि सोबतच त्यांनी सोबत आणलेले वृक्षाचे वृक्षारोपण सुद्धा करण्यात.
शरद रंगारी यांनी सुद्धा वृक्ष आणले व पूज्य भन्तेजी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पूज्य भन्ते नागसेन यांना विजय नंदागवळी यांचे कडून फळदान करण्यात आले.
रोज विहारात सकाळी 12 ते 1 या वेळात धम्मपद जातक कथा वाचन होणार आहे व 4 ते 6 प्रवचन आणि वंदना होणार आहे.
वृक्षारोपण करतांना पूज्य भन्ते नागसेन, विजय नंदागवळी, शरद रंगारी, नितीन रामटेके, मनोज कोटांगले, दीपक मेश्राम भावेश कोटांगले, डी जी रंगारी,प्रज्ञा दिरबुडे, वसंता रामटेके, वंदना नंदेश्वर, छाया नंदागवळी, साधना रामटेके,शालू कोटांगले, साधना मेश्राम,कार्तिक मेश्राम, देवदास रामटेके, प्रमोद करवाडे,मंदा गेडाम, गोपीचंद तरजुले, संकल्प कोटांगले, आरुष कोटांगले व उपासक उपासिका उपस्थित होते.



