स्व.वत्सला बावनेर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप..

युवराज डोंगरे/खल्लार

 शिंगणापूर गावातील राहिवासी अशोक महादेव बावनेर ( केन्द्रप्रमुख दर्यापूर पं .स शिक्षण विभाग ) यांनी त्यांची आई स्व सौ वत्सला महादेव बावनेर यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ गावातील इयत्ता १ ली ते १० वी च्या एकूण ३५ विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले . प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण १० रजिस्टर / वहया , पुस्तके , पेन, पेन्सील इत्यादी साहित्य प्रदान करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे पोलीस पाटील राहुल बावनेर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून अशोक बावनेर , वर्षा अशोक बावनेर , सुनिता पुंडलिक बावनेर , पुंडलिक बावनेर इत्यादी उपस्थित होते तसेच कर्यक्रमाला अतुल बावनेर , संदिप बावनेर , सौ योगीता बावनेर , डॉ अदित्य बावनेर इत्यादी गावकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रसाद बावनेर यांनी केले.

         स्व. वत्सलाबाई ह्या पुरोगामी विचारांच्या आणी शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्व सुपरिचीत होत्या , मनमिळाऊ स्वभाव , मदतकार्यासाठी सदैव तत्पर , आणि नावाप्रमाणे वात्सल्य मूर्ती अशा या माऊलीने संयुक्त (बावनेर ) कुटुंबात सर्वच मुला मुलींच्या नातवांच्या सर्वाच्या शिक्षणासाठी प्रेरणा दिली आर्थिक मदत दिली प्रोत्साहन दिले.आईच्या विचारांचा प्रगल्भ वारसा असाच पुढे बहरत राहावा यासाठी बावनेर कुटुंबाच्या वतीने अशोक बावनेर आणी त्यांच्या सहचारिणी वर्षा बावनेर यांनी हा पुरोगामी विचार प्रत्यक्ष आचरणात आणला. इतर लोकांनी यातून प्रेरणा घेऊन असे मदतकार्य करावे व समाजाप्रती आपले योगदान द्यावे .