डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शिवराजपुर गावातील लाभार्थ्यांना आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते वॉटर कॅन चे वाटप..

ऋषी सहारे 

संपादक

 देसाईगंज/ शिवराजपुर: 

     राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने‘ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजने अंतर्गत वॉटर कॅन चे वाटप आमदार कृष्ण गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जवळपास 360 ग्रामस्थांना वॉटर कॅन चे वाटप करण्यात आले. मानव वन्‍यजीव संघर्ष टाळण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाच्‍या वनविभागातर्फे डॉ. श्‍यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातुन वनालगतच्‍या गावांमधील नागरिकांना वॉटर कॅन उपलब्‍ध करुन दिले.

 यावेळी आमदार कृष्णा गजबे, मोतीलाल कुकरेजा जिल्हा उपाध्यक्ष, धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक वनविभाग वडसा, गोपाल उईके मा.प.स उपसभापती, विजयजी धांडे वनपरिक्षेत्र अधिकारी, बोरकुले वनरक्षक, सुषमाताई सयाम सरपंच शिवराजपुर, नितीन राऊत वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष कोंढाळा, बद्रीनाथ राऊत वन समिती अध्यक्ष डोंगरगाव, प्रमोद झिलपे संयुक्त वन व्यवस्थापन समिती शिवराजपुर, नानाजी सयाम संयुक्त वन व्यवस्थापन समिती उसेगाव, हेमंत दर्वे पोलीस पाटील शिवराजपुर, अस्मिताताई दर्वे ग्रापं सदस्य शिवराजपुर, मनीषाताई नान्ने, वासुदेवजी झिल्पे माजी उपसरपंच शिवराजपुर, राजेंद्रजी दुपारे उपाध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती, कुसुमबाई दुपारे सदस्य, नीलकंठ मेश्राम सदस्य, विद्याताई सूर्यवंशी सदस्य, रेश्माताई मेश्राम, सदस्य व वनविभागाचे कर्मचारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.