Home Maharashtra छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1″ अंतर्गत जांभुळघाट...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1″ अंतर्गत जांभुळघाट येथे झाले शिबिर सपंन्न…. — आज १० एप्रिल २०२६ रोज शनिवारला झाले शिबीर संपन्न..

शुभम गजभिये

   विशेष प्रतिनिधी

     महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे,तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1” आयोजित करण्याबाबत शासन निर्णय क्र. मराअ-2026/प्र.क्र.09/समन्वय-1 दिनांक 18/02/2026 अन्वये घेण्यात आला आहे.

             त्या अनुषंगाने दिनांक 10/04/2026 रोजी आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा जांभुळघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजीत करण्यात आले होते.

         सदर शिबीराचे अध्यक्ष श्रीमती निलीमा रंगारी,अपर तहसिलदार,भिसी या उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी तथा कार्यक्रमाचे आयोजक म्हणून श्री श्रीधर राजमाने तहसलिदार चिमुर हे उपस्थित होते. 

               तसेच विशेष अतिथींच्या हस्ते यावेळी,प्रामुख्याने आधार कार्ड,संजय गांधी योजना प्रमाणपत्र,अधिवास,जात, उत्पन्न,राशन कार्ड,विविध दाखले,इतर विभागांचे लाभार्थी यांना शासकीय योजना विषयक लाभाचे वाटप करण्यात आले.

       भूमी अभिलेख विभागाकडून सनद वाटप करण्यात आले.तालुका कृषी विभागाकडून पी.एम.कीसान लाभार्थी व इतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

             अध्यक्षीय भाषणामध्ये अपर तहसिलदार भिसी यांनी आयोजीत करण्यात आलेल्या शिबीराचा सर्व नागरीकांनी लाभ घेण्याबाबत आवाहन केले.तर कार्यक्रमाच्या प्रस्तावने मध्ये सदर शिबीरामध्ये देण्यात येणा-या विविध विभागाच्या योजनेची माहिती तहसिलदार चिमुर यांनी दिली.

        तसेच सहा.आयुक्त पशुसर्वधन व दुग्धविकास अधिकारी डॉ.आर.एल. ओव्हाळ,सहा.प्रकल्प अधिकारी एम.व्ही.डुले व उप अधिक्षक भुमी अभिलेख कावळे यांनी आपल्या विभागाबाबत माहितीचे मनोगत व्यक्त केले.

            सदर कार्यक्रमावेळी जांभुळघाट मंडळातील प्रतिष्ठीत नागरीक,ग्रामस्थ तसेच चिमुर तालुक्यातील इतर प्रशासकीय विभाग प्रमुख व चिमूर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार,सुर्यकांत पाटील जांभुळघाट मंडळातील मंडळ अधिकारी रंजना ढोले,सर्व ग्राम महसूल अधिकारी,महसूल सेवक,महसूल सहाय्यक तसेच विविध योजनाचे लाभार्थी, ईत्यादी मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

        सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता चौधरी, ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रफुल मेश्राम,महसूल सेवक यांनी केले.