Home Maharashtra चिमूर तालुक्यातील त्या बड्या वाळू-मुरुम तस्करांकडे कोण लक्ष देणार?

चिमूर तालुक्यातील त्या बड्या वाळू-मुरुम तस्करांकडे कोण लक्ष देणार?

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

     चिमूर तालुकातंर्गत अवैधरित्या सुरु असलेल्या वाळू उत्खननाकडे/वाळू तस्करीकडे तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असले तरी त्यांची नजर बड्या वाळू तस्करांकडे आणि मुरुम तस्करांकडे जात नसल्याची खमंग चर्चा चिमूर तालुक्यातील नागरिकांत दिसून आली आहे.

              चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी,चिमूर,भिसी येथील वाळू आणि मुरुमांची तस्करी करणारे बडे धेंडे जाग्यावरुनच प्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना झोपायला लावतात काय?अशाच प्रकारचे चित्र सध्या तरी वाळू तस्करीबाबत आणि मुरुम तस्करी बाबत दिसून येते आहे.

       अवैध वाळू आणि मूरुन तस्करी करीता बऱ्याच जनांनी जेसीबी आणि ट्रॅक्टर घेतले असल्याची जनमानसात सर्वत्र चर्चा आहे आणि कुठून कोणता बडा तस्कर वाळूची आणि मुरुमाची शिकार दररोज करतोय याची माहिती सुद्धा चिमूर तालुक्यातील नागरिकांना आहे.

         चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी अवैध वाळू आणि मूरुन चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी कोतवाल,पोलिस पाटील,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा सदस्य,महिला बचत गटाच्या अध्यक्ष-सदस्य,यांचे सहकार्य घेतले तर अल्प कालावधीतच वाळू व मूरुन तस्करांचे कंबरडे मोडणार हे सत्य आणि वास्तव आहे.

       रोज रात्रोच्या वेळी नेरी,चिमूर व भिसी येथील बडे वाळू तस्कर आपल्या नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी यंत्रणेला चकमा देत अजूनही वाळूची तस्करी करीत असल्याचे आम जनतेचे म्हणणे आहे.

         वाळू तस्कर असलेल्या गरिबांना जाळ्यात अडकवितांनाच (कायदेशीर कारवाई करताना) बड्या वाळू तस्करांकडे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,तहसीलदार श्रिहरी राजमाने यांची नजर तिक्ष्णपणे गेली पाहिजे याही मताची जनता आहे.