ब्रेकिंग न्यूज… — गुटखा व वाळू माफियांचा सामाजिक कार्यकर्ते भिमराव कुऱ्हाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला.. — अवैध रेती प्रकरणातून जिवघेणा हल्ला..

युवराज डोंगरे/खल्लार

           उपसंपादक

        दर्यापूर तालुक्यातील  सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे  माजी तालुकाध्यक्ष भिमराव कुऱ्हाडे यांच्यावर आज १० एप्रिल ला दुपारच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

         आज दुपारच्या १ ते २ वाजेच्या दरम्यान लोतवाडा येथील बसटाप वर ही घटना घडली आहे.भिमराव कुऱ्हाडे यांना घरून बोलून त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करून त्यांच्या पोटात धार धार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

       आणि दुसरा वार वाचवण्याचे प्रयत्न करत असताना भिमराव कुऱ्हाडे  यांच्या हाताच्या पंजाला जबर मार लागला आहे.

       या हल्ल्यात भिमराव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले असता,चाकूचे घाव मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे पुढील उपचाराकरिता अमरावती येथे  स्थानांतरीत आले आहे.

     घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस स्टेशनचे खुप्रिया मनोज फुकट,येवदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी विठ्ठल मुंडे यांच्यासह पथकाने ग्रामीण रुग्णालय दर्यापूर येथे भेट देऊन रुग्णांची पाहणी व बयान नोंद  केला.

      या झालेल्या गंभीर हल्ल्याने दर्यापूर तालुक्यातील  नागरिकांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे.या मुजोर वाळू माफिया व गुटखा माफिया यांना अभय कुणाचे आहे असा प्रश्न दर्यापूर तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे.

        वृत्त लिहीस्तोवर येवदा पोलिस स्टेशन संबंधित आरोपींवर कुठल्या पद्धतीने कार्यवाही करते हे पाहणे गरजेचे आहे.संबंधित प्रकरण लोतवाडा बीट जमादार विठ्ठल मुंडे यांच्या हद्दीत अवैद्य घटना घडत आहेत.