आदर्श शाळातंर्गत आदर्श विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची.:- डॉ. सतीश वारजुकर.. — चिमूर तालुक्यातील मौजा हिरापूर जि.प.शाळेला मिळाला आदर्श शाळेचा दर्जा.

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

       भारत देशाचे तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2007 साली स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात आदर्श शाळा योजनेचा उल्लेख केला होता.

      त्यानंतर प्रतिगट एक शाळा या प्रमाणात बुद्धिमान व ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण देता यावे,यासाठी उत्कृष्ट तेचा मापदंड असणाऱ्या आदर्श शाळा उभारणे हा या योजनेचा उद्देश आहे.या योजने अंतर्गत दुसऱ्याच शाळेला आदर्श शाळा म्हणून दर्जा मिळाला होता.

          परंतू गावकऱ्यांनी डॉ. सतिश वारजूकर यांच्याकडे सतत पाठपुरवठा केला. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व भावनिक क्षमतेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना काही निकषाच्या आधारे आदर्श शाळा अंतर्गत काही निधी प्रदान केली जाते.

         चंद्रपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सतीशभाऊ वारजूकर यांच्या प्रयत्नातून चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील शाळेला आदर्श शाळेचा दर्जा मिळाला.या योजनेंतर्गत हिरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक कोटी,आठ लाख,दहा हजार रुपये मिळणार आहेत. 

         मिळालेल्या निधीतून हिरापूर येथील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक,सर्वांगीक,क्षमतेच्या विकासाला प्राधान्य मिळणार आहे.

       चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला आदर्श शाळेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे डॉ.सतीशभाऊ वारजूरकर व चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक यांचा सत्कार हिरापूर वासियायांनी केला.

       यावेळी ग्रामपंचायत सरपंच मंदा उरकुडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव दडमल,ग्रामपंचायत सदस्य दीपक नगराळे,गुणवंता ढोक,बंडू पोहनकर,आदी उपस्थित होते.