Home Social हरिहर विद्यालयाच्या प्रागणात नगर पंचायत पारशिवनी तर्फे स्वच्छ आणि हरित दिवाळी साजरी...

हरिहर विद्यालयाच्या प्रागणात नगर पंचायत पारशिवनी तर्फे स्वच्छ आणि हरित दिवाळी साजरी करून घेतली शपथ.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:– नगरपंचायत असलेल्या पारशिवानी शहरात,”स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियान-2023,स्वच्छ सर्वेक्षण 2024,माझी वसुंधरा अभियान 4.0,अंतर्गत येणा-या दिवाळी सणानिमित्त नगर पंचायत पारशिवानी तर्फे स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत मोहिम राबवुन शहरामध्ये पर्यावरण पुरक उत्पादन व्हावे,ऐकरी प्लास्टिकचा वापर टाळणे करिता व शहरात प्रदूषण कमी राहावे या उद्देशने पारशिवनी शहरातील हरिहर विद्यालय पारशिवनी येथील विद्यार्थ्यांकडून “शपथ घेण्यात आली.

            “शपथ मध्ये “मी इको-फ्रेंडली स्थानिक उत्पादने वापरण्यासाठी वचनबद्ध आहे,सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणार नाही आणि स्वच्छ आणि हरित दिवाळी साजर करू अशी शपथ घेण्यात आली.