Home Social साथ फाउंडेशन सावलीतर्फे स्वच्छतादुत परेश तावाडे यांचा सत्कार… — परेश तावाडे...

साथ फाउंडेशन सावलीतर्फे स्वच्छतादुत परेश तावाडे यांचा सत्कार… — परेश तावाडे हे तरुण पिढीचे आदर्श,स्वच्छता व आरोग्य व पर्यावरण संबंधित त्यांचे योगदान महत्वाचे :- रोहित बोम्मावार,संचालक चंद्र.जि.म.सह.बँक तथा अध्यक्ष साथ फाउंडेशन…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

     सावली शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, सर्वांचे वाढदिवस अगदी तोंडपाठ ठेवणारे, स्वच्छता मित्र व सामाजिक दायित्व जोपासणारे,पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे तालुका कार्याध्यक्ष परेशजी तावडे यांना जन्मदिनानिमित्त तसेच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशन चे अध्यक्ष रोहितभाऊ बोम्मावार यांनी सन्मानचिन्ह, ग्रामगिता,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

       नवरात्रौच्या पावन समारंभा प्रसंगी एका नियोजित कार्यक्रमात माँ शक्ती शारदा उत्सव मंडळातर्फे सुद्धा परेशजी तावाडे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले.अविरत निस्वार्थ सेवा भावना जोपसणारे अवलिया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारून सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरण संबंधित समस्यांना घेऊन ते सामाजिक कार्यत तत्पर असतात,मोठ मोठ्या मंचावर,विविध मंडळ,संस्था,राजकीय नेते व प्रशासनाकडून देखील त्यांचा कार्याची दखल घेतली गेली आहे.

          कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असताना सुद्धा समाजसेवी परेश तावाडे कधी डगमगले नाही,पत्रिका वाटप करणे,जे मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे व हे सर्व करताना सामाजिक भान व स्वतःची जबाबदारी समजून समाजसेवेचा कामाला कधी नकार दिला नाही.

        आज परेश तावाडे यांचा कार्याला सलाम,त्यांचा सत्कार करताना आम्हाला अत्याधिक आनंद होत आहे,परेश तावाडे हे निस्वार्थपणे जनसेवा करीत आहेत,ते तरुण पिढीचे आदर्श,स्वच्छता व आरोग्य व पर्यावरण संबंधित त्यांचे योगदान महत्वाचे आहे,अश्या सावली भूषण व्यक्तिमत्वाचे सत्कार करणे हे एक उत्तम कार्य,त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असे प्रतिपादान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष रोहितभाऊ बोम्मावार यांनी केले आहे.

         याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील राईंचवार,शंकरजी दिकोंडवार,जगडीशजी बन्सोड सर,विनोदजी सातपुते,कपिलजी लोडेल्लीवार,पंकजजी सिद्धेक्कीवार आदी मंचावर उपस्थित होते.