वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिल्यास साकोली विधानसभेची निवडणूक लढणार :- समाजभूषण डी जी रंगारी

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

 साकोली – ऑक्टोंबर ते नोव्हेंबर च्या जवळपास होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत.

              विधानसभेची सर्व रंगीत तालीम प्रत्येक पक्षाकडून कोण उमेदवार राहील त्याची चाचणी सुरू असून आपापले उमेदवार ठरवण्याकरिता सर्व पक्ष कामाला लागलेले असून साकोली विधानसभेकरिता पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व अनेक पुरस्कार प्राप्त, समाजभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त, व्यक्तिमत्व म्हणजे डी.जी. रंगारी हे साकोली येथील रहिवासी असून ते शिक्षक पेशामध्ये त्यांनी 33 वर्षे सेवा दिली.

           सोबतच गेल्या 25 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन व पत्रकारिता या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करून कित्येक लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्य व या लोकांवरअन्याय होते त्यांच्यासाठी धावून जाणारा व्यक्तिमत्व म्हणजे डी.जी.रंगारी गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणारे व नियमित तत्पर व लोकांसाठी धावून जाणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे डी जी रंगारी आहेत.

            त्यांना सन 2014 ला महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

            तसेच त्यांना आतापर्यंत पत्रकारिता समाजसेवा, पर्यावरण, आदर्श शिक्षक असे 18 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अजूनही त्यांच्या काम सुरू आहे. त्यांच्याकडे एशियन न्यूज चॅनेल व भीमपर्वा चॅनल ते संपादक आहेत व विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असून भारतीय बौद्ध महासभा नागपूर विभागीय प्रसिद्धी प्रमुख सुद्धा आहेत. विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या काम असून दांडगा अनुभव आहे.

           पत्रकारितेच्या माध्यमातून या पंचवीस वर्षाच्या काळात भेल प्रकल्प असो, रस्त्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न असो संजय गांधी निराधार लोकांचे प्रश्न, अतिक्रमण धारकांचे प्रश्न असे विविध प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचा काम आतापर्यंत केलेले आहेत .आणि समोरही ते करत करणार आहेत.

            सध्या ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे भंडारा जिल्हा संघटक असून त्यांची साकोली विधानसभा सभेकरिता पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर निश्चितच ते उभे राहण्यास इच्छुक आहेत. परंतु कोणाला उमेदवारी देणार हे शेवटी पक्षश्रेष्ठींकडे आहे,वरिष्ठांकडे आहे.

        पण संधी मिळालाच नक्की त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न डी जी रंगारी करणार आहेत हे विशेष.

           डी जी रंगारी हे गेल्या दोन वर्षापासून सेवानिवृत्त झालेले आहेत व परिसरातील लोकांची इच्छा आहे की हे विधानसभेच्या निवडणुकीत एक चांगले व्यक्तिमत्व एक सुशिक्षित असा एक व्यक्तिमत्व असायला पाहिजे अशी जनतेची इच्छा आहे.