Home Maharashtra संतप्त आदिवासी समाजाचा मोर्चा एसडीएम कार्यालयावर धडकला,”वनवासी नही हम मुलनीवासी है”… ...

संतप्त आदिवासी समाजाचा मोर्चा एसडीएम कार्यालयावर धडकला,”वनवासी नही हम मुलनीवासी है”… — आदिवासींना वनवासी संबोधणाऱ्या गृहमंत्र्यांचा निषेध…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

       गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाला ‘वनवासी ‘संबोधत मूलनिवासी समूहाचा अपमान केला असा आरोप करीत गृहमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत आज आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या आरमोरी, देसाईगंज, कूरखेडा, कोरची व धानोरा तालुक्यातील समस्त ४५ पोटजाती आदिवासी समाजाचा वतीने बिरसामुंडा चौक नविन बसस्थानक ते एसडीएम कार्यालयावर भव्य मोर्चा काढत निवेदन देण्यात आले.

        देशाची राजधानी दिल्ली येथे जनजाती बांधवांचा कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यानी आदिवासींचा उल्लेख वनवासी असा केला होता हा शब्द मानहानीकारक असून आदिवासी हा जल जगंल जमीनीचा मालक व मूलनिवासी असून त्याना संवैधानिक असलेला आदिवासी हाच शब्दप्रयोग करण्यात यावा व या शब्दप्रयोगाबद्दल गृहमंत्र्यांनी देशाची व समाजाची माफी मागावी या प्रमूख मागणी सह आदिवासी समाजाचा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरीता आज हजारोंचा संख्येत आदिवासी बांधवांनी एसडीएम कार्यालयावर धडक देत एसडीएम किरण वाघस्कर यांचा मार्फत मा.राष्ट्रपतीना निवेदन पाठविले आंदोलनात आमदार रामदास मसराम आदिवासी समस्त ४५ पोटजाती समाज संघटनेचे अध्यक्ष तिमेश्वर कोरेटी,रामसूराम काटेंगे आदिवासी कंवर समाजाचे मार्गदर्शक डॉ मेघराज कपूर, आदिवासी हलबी जमातीचे जिल्हाध्यक्ष शालीकराम मानकर ,माजी कांग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ,संजय कोकोडे,माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी, माजी सभापती गिरीधर तितराम,गोविंद टेकाम, शशिकांत मडावी,दिलीप घोडाम,अरूण सोयाम, प्रभाकर जूमनाके, बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जिग्नेश वरखेडे ,माजी नगराध्यक्ष आशाताई तूलावी,गुलाब सोनकूकरा,श्रीराम दूगा, संध्याताई नैताम,प्रतिभा सिडाम,निलकंठ आलाम,चिरकूटा नैताम,विजय तूलावी, धरमदास उईके, गणेश काटेंगे, श्रीराम मडावी यांचा सह आपचे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी, काँग्रेस तालुकाध्यक्ष जिवन नाट, जयंत हरडे, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल,वसिम शेख देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बूल्ले,परसराम टिकले,डॉ.भैय्यालाल राऊत यांचा सह हजारोंचा संख्येत आदिवासी बांधव सहभागी झाले होते.