Home Maharashtra खल्लारचे ठाणेदार रविंद्र बारड यांना निरोप..‌. 

खल्लारचे ठाणेदार रविंद्र बारड यांना निरोप..‌. 

  युवराज डोंगरे

उपसंपादक/खल्लार..

      अमरावती जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक यांच्या आदेशान्वये अमरावती जिल्हा अंतर्गत पोलिस प्रशासनात पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात खल्लारचे ठाणेदार रविंद्र बारड यांचा समावेश आहे.

       अमरावती (ग्रामिण ) पोलिस प्रशासनातील खल्लार पोलिस स्टेशन येथे सेवेचा कार्यकाळ लक्षात घेता ठाणेदार रवींद्र बारड यांची बदली यवतमाळ येथे करण्यात आली.

       रविंद्र बारड यांनी खल्लार पोलिस स्टेशनच्या ठाणेदारपदी रुजू झाल्यापासून पोलिस स्टेशन हद्दीतील त्यांच्या दिड वर्षाच्या कालावधित सर्वच अवैध धंद्याना आळा घालून त्यांच्यावर वचक बसविला होता. 

      पोलिस दलातील सर्व अधिकारी,सहकारी कर्मचारी, अंमलदार,पोलिस कर्मचारी व सर्व गावातील नागरिक यांच्यासोबत सुरुवातीपासूनच सलोख्याचे संबंध ठेवले होते.

       अश्या कर्तव्यदक्ष ठाणेदारांचा पोलिस स्टेशन खल्लार येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

      त्यावेळी उपस्थित असलेले पोलिस अधिकारी,अंमलदार भाऊक झाले होते.ठाणेदार रविंद्र बारड यांचा सपत्नीक सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.