भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील विद्यानगर मध्ये दिनांक ८ जून रोजी प्रशांत कोडाप यांच्या घरावर काल रात्री साडेआठच्या दरम्यान अचानक प्रशांत कोडाप यांच्या घरावर वीज पडली. प्रशांत कोडाप यांचे दुमजली घर असून घरावरच्या रेलिंग वर वीज पडून रेलिंग चा काही भाग खाली कोसळला त्यामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले.

सविस्तर माहिती असे की काल ८जून रोजी सायंकाळी थरकाप उडणारी घटना साडेआठच्या दरम्यान धानोरा येथील विद्यानगर प्रभाग क्रमांक एक मध्ये घडली ना वादळ ना वारां ना पाऊस ना आभाळात ढग दाटून आले तरीही अचानक वीज कोसळली आश्चर्य व्यक्त केले जात आहे वीज कोसळली तेव्हा जणू काही एखादी बॉम्ब फुटावा आणि आजूबाजूच्या परिसरामधील कचरा दगड उडावे अशा पद्धतीने काल वीज कोसळण्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला.
काल दिनांक ८ जुन रोजी सायंकाळी साडेआठच्या दरम्यान स्वयंपाक गृहामध्ये स्वयंपाक करत असताना माझ्या स्वयंपाक गृहाच्या खिडकीच्या समोरच प्रशांत कोडाप यांचे घर आहे अचानक वीज पडल्याने काही मिनिटांसाठी तर मी घाबरूनच गेलो होतो की नक्की काय झाले कशाचा आवाज आहे लगेच माहित पडले की प्रशांत कोडाप यांच्या घरावरचा रेलिंग चा काही भाग माझ्या स्वयंपाक खोलीच्या समोर असलेल्या रोडवर रेलिंग चे तुटलेले दगड आणि कचरा रोडवर उडताना मी प्रत्यक्ष पहिल्यांदा अनुभवले आहे ही थरकाप उडवणारी घटना मी सुद्धा काही क्षणासाठी घाबरून गेलो होतो की नक्की काय झाले.
भाविकदास करमनकर यांचा प्रत्यक्ष अनुभव..



