बाळासाहेब देशमुख काका यांच्या जनपरिवर्तन विकास आघाडी पॅनलचे सतरा पैकी सहा जागेवर पहिल्यांदाच दणदणीत विजय…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         टेंभुर्णी तालुका माढा येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत,, मे देशमुख अँड कंपनीचे मालक व ग्रामपंचायत निवडणूक पॅनल मार्गदर्शक बाळासाहेब लक्ष्मण देशमुख (काका) यांच्या मार्गदर्शना खाली व पॅनल प्रमुख सुरज बाळासाहेब देशमुख (भैय्यासाहेब) व रावसाहेब नाना देशमुख यांच्या प्रयत्नाने 17 पैकी 6 जागेवर दणदणीत विजय मिळवला तर 11 उमेदवारांना थोड्याफरकाच्या मताने पराजय पत्करावा लागला.

             6 उमेदवार विजय घोषित झाल्यावर बाळासाहेब देशमुख बोलत आसताना म्हणाले की, पहिल्यांदाच आम्ही ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आसता आम्ही 6 जागेवर विजय मिळविला यामध्ये आम्ही समाधानी आहोत. आत्ता आम्ही फक्त टेलर दाखविला पिक्चर बाकी पुढे आहे. आगामी काळामध्ये इथून पुढे टेंभुर्णी ग्रामपंचायती मध्ये परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे वर्चस्व घडवून आनले. जाईल गोर गरीब जनतेने आम्हाला मतदान रुपी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गोर गरीब गरजू व मजूर आसो अथवा तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मि नेहमीच प्रयत्नशील राहणार आसल्याचे बाळासाहेब देशमुख यांचे यावेळी उदगार.

         टेंभुर्णी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक शांततेत व कोठेही गालबोट न लागता पार पाडण्यात आली जन परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे सर्वच कार्यकर्ते ताकद पणाला लावून काम करीत आसणारे. पॅनल प्रमुख सुरज बाळासाहेब देशमुख (भैय्यासाहेब) रावसाहेब नाना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे प्रशांत देशमुख संतोष कानडे (वकील) सुधीर महाडिक सोमनाथ महाडिक,महादेव स्वामी,सारंग गायकवाड गणेश सरवदे, निखिल खरात लखन माने शुभम देशमुख संजय लोंढे रोहित खडके, वासुदेव खुळे प्रशांत खुळे अक्षय कांबळे अजित बिसुळगे, बाळासाहेब बारवे, नागनाथ भरगंडे, अझर तांबोळी, धनुभाऊ खडके, किरण खडके, गोविंद खडके, विलास गायकवाड, माऊली महाडिक, नितीन महाडिक, रघुनाथ बनसोडे,गणेश खरात,साहिल तांबे,विशाल हवलदार,सुहास देशमुख या सर्वांच्या प्रयत्नाने टेंभुर्णी ग्रामपंचायत मध्ये 17 पैकी 6 जागा निवडुन आणल्या व विजय झालेले खाली दिलेल्या प्रमाणे उमेदवार 1)लखन विजय हवलदार यांना मिळालेली मते- 837, विद्या शैलेश ओव्हाळ -1047, रूपमती राजाराम थोरात -1035, सचिन नीलकंठ होदाडे -578, खरात प्रतिभा परमेश्वर -1077 सईबाई वैभव देशमुख -1180, तसेच 11 उमेदवार थोड्याफार मताधिक्याने पराभवाला सामोरे जावे लागले.