बाबुलवाडा येथे लाल बहादूर शास्त्री विद्यालयात रक्तगट व सिकलसेल तपासणी शिबिर… — आयुष्यमान भारत स्वास्थ आरोग्य शिबिराचे आयोजन…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशीवणी

पारशिवनी:– लाल बहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबुळवाडा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या वतीने सिकलसेल व रक्तगट ‘तपासणी व आयुष्यमान भारत स्वास्थ खाता शिविर दि. 07 नोव्हेंबर 2023 ला आयोजित करण्यात झाले होते.

         ह्या शिबिरात शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी भरघोष प्रतिसाद दिला. सुमारे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थी वरील शिबिरा विषयी अनभिज्ञ असतात, जागृत नसतात. त्यामुळे रोग अंगावर घेवून ते जगत असतात तसेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचे रक्तगट माहित नसतात.अनेक ठिकाणी आणि रक्तगटाचे काम पडत असतात त्यामुळे शिबिर हे विद्यार्थ्याच्या उपयोगी पडलेले आहे.

‘आयुष्यमान भारत स्वास्थ अंतर्गत आभा कार्डही शतप्रतिशत विद्यार्थ्यांनी काढलेले आहे.या कार्डचा सुद्धा उपयोग विद्यार्थ्यांना पुढे होणार आहे.

         ” सिकलसेल व रक्तगट तपासणी शिविर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांच्या वतीने घेण्यासाठी लाल बहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान व कला) च्या मा. प्राचार्या राजश्री राजीवजी उखरे, मा. सचिव पंकजजी बावनकुळे साहेब, व प्राचार्य उखरे मॅमची संपूर्ण टिम यांच्या अथक परिश्रमामुळे शिबिर यशस्वी झाले.