फर्ग्युसन महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांचे आळंदीत विशेष मैत्री शिबिर….

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालय स्वायत्त पुणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ‘सौरप्रणाली’ साधुया ग्रहांशी मैत्री हे विशेष मैत्री शिबिराचे आळंदी ठिकाणी दि. ६ ऑक्टोबर आणि ७ ऑक्टोबर रोजी यशस्वीरित्या पार पडले. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन कुलकर्णी, डॉ.अभिजीत पापलकर आणि प्रा.निलम पाटील उपस्थित होते. डॉ.अभिजीत पापलकर यांनी मैत्री – एक जादूची कांडी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

            राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिर परिसरातील साफसफाई करुन श्रमदानाने मैत्री शिबिरास प्रारंभ केला. विशेष मैत्री शिबिराच्या दुसऱ्या सत्रात आळंदी येथील चिमुकल्या मुलांनी हरिपाठ सादर केला. पुढील तिसऱ्या सत्रात आळंदी येथील ह.भ.प प्रा.गोरक्षनाथ महाराज उदागे यांनी रा.से.योजनेच्या स्वयंसेवकांना फर्ग्युसन महाविदयालयातील त्यांच्या आठवणी आणि मैत्री-ज्ञानोबा माऊलीचे विचार याविषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गोरक्षनाथ महाराजांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील संस्कृत विभागातून संस्कृत पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला होता.

          दि.७ ऑक्टोबर या विशेष मैत्री शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या समान वादविवाद स्पर्धा, राष्ट्रीय एकात्मता आणि ईशान्य भारत, नाटक अशा विविध उपक्रमात स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी रा.से.योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संतोष फरांदे, प्रा.सोनालिका पवार आणि शिवाजी कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. सौरभ बेलकर यांनी विशेष सहकार्य केले.