डायट कडून साखरे, कोवे, उंदिरवाडे आचार्य पदवीने सन्मानित…

ऋषी सहारे

संपादक

       गडचिरोली- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे कार्यरत असलेले प्रभाकर गोमाजी साखरे, कुणाल मारोती कोवे, सुनील मधुकर उंदिरवाडे यांना एम.बी. आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे दिनांक 7 आक्टोबर 2023 रोजी इंदोर (मध्यप्रदेश) येथे संपन्न झालेल्या भव्य दीक्षांत समारंभात शिक्षणशास्त्र विषयात आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.

           यावेळी राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय, एम.बी. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीप्ती भादोरीया, रजिस्ट्रार डॉ. विद्या भुषण सिंह, आचार्य संतोष भार्गव व देश विदेशातील मान्यवर उपस्थित होते.

           शैक्षणिक गुणवत्ता व शिक्षक सक्षमीकरणासाठी उच्च विद्या विभुषीत उपयोगीता सिध्द शिक्षकांना विहित निवड पद्धतीने मुलाखती द्वारे राज्य शासनाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर नियुक्त केले होते यामध्ये डॉ प्रभाकर साखरे, डॉ.कुणाल कोवे व डॉ सुनील उंदिरवाडे हे गेल्या सहा वर्षांपासून जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करत आहेत. Doctor of Education या शिक्षणशास्त्र विषयात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पदवीने सन्मानित करण्यात आल्याने डायटचे प्राचार्य धनंजय चापले व सर्व अधिव्याख्याता, सहकारी मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.