तथागत भगवान बुद्धानी जो कार्यकारणभावाचा सिद्धांत आम्हाला दिला.तो सिद्धांत आम्हाला विज्ञान आणि विवेकातून मानवतेकडे घेऊन जातो आणि ” सदविचारी माणूस ” बनण्यासाठी प्रेरित करतो. तो सिद्धांत म्हणजे डोळ्याला दिसून त्याचा प्रत्यय आला पाहिजे. कानाने ऐकून त्याची प्रचिती आली पाहिजे.जिभेने चव समजली पाहिजे. नाकाने सुगंधी दुर्गंधी समजली पाहिजे. हाताने स्पर्श केल्यावर त्याची जाणीव झाली पाहिजे. या पाच इंद्रिया सोबतच आमच्या डोक्यातील मागील छोट्या मेंदूच्या माध्यमातून हृदयाच्या संपर्कातून जी सदसदविवेक बुद्धी अविष्कारीत होते. त्यालाच श्रद्धा म्हणतात. याच श्रद्धेतून ” विवेकाचा ” जन्म होतो. याच विवेकातून डोळस श्रद्धा विकसित होते.
सोळाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत संपूर्ण जग विविध धर्माच्या आंधळ्या श्रद्धेच्या नियमानुसारच आपापले राज्यकारभार करत असत. त्यामुळे जगात अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांकामध्ये सर्वच क्षेत्रात विषमता होती. ही विषमताच मानवाच्या अधोगतीला कारणीभूत होती.
परंतू ,सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून जेंव्हा तथागताच्या या कार्यकारणभावाच्या सिद्धांतानुसार वैज्ञानिक, संशोधकांनी विविध क्षेत्रात शोध लावण्यास सुरुवात केली. तेंव्हाच खऱ्या अर्थाने अडीचहजार वर्षांपूर्वीच्या या सिद्धांताला प्रयोगातून वैज्ञानिकांनी सिद्ध केले. म्हणूनच जगातील प्रमुख शास्त्रज्ञानी तथागतांना विश्वाचे प्रथम ” मनोवैज्ञानिक आणि महागुरू ” म्हणून आदर्श मानले.
परंतू ,याच सिद्धांताचे आव्हान आपल्या देशातील मनुवाद्यांना पेलता आले नाही. म्हणून त्या सिद्धांताला बदनाम करण्यासाठी आज एकविसाव्या शतकात आणि विशेष म्हणजे 2014 पासून याच बुद्ध धम्मातील आम्हीच खरे धम्माचे वारसदार म्हणून मिरवणारे ( अपवादात्मक पण बोटावर मोजण्या इतकेच ) मग ते चिवरातले भंतेजी / माताजी असतील..
शुभ्र वस्त्रातील उपासक/ उपासिका असतील…….
यांना हाताशी धरून RSS / मनुवाद्यांनी त्या सिद्धांताला बदनाम करण्याचा प्रयत्न आज पराकोटीला पोहचवला!
कारण…
बुद्ध धम्माच्या पवित्र त्रिपिटक ग्रंथ आणि मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या आणि इतर ऐतिहासिक शीलालेखाच्या आधारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ग्रंथांचा वैज्ञानिक कसोटीवर घासून ( जरी त्या ग्रंथात अनेक काल्पनिक कथाच्या अंध श्रद्धेला चालना देणाऱ्या जातक कथा असल्या तरी सुद्धा ) ” त्या धम्माच्या सत्यापर्यंत ” पोहचून त्यांनी ” बुद्ध आणि त्यांचा धम्म ” हा ग्रंथ आपल्याला दिला…
परंतू ,त्यानंतर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अनेक पाली भाषेत डॉक्टर्स झाले. अनेक भंतेजी पाली भाषेत डॉक्टर्स झाले.परंतू ,कुणीही एकविसाव्या शतकात त्याच ” बुद्ध आणि त्यांचा धम्म ” या ग्रंथाचे वाचन आणि विश्लेषण हे 100% विज्ञानाच्या कसोटीवर करण्यात आणि त्याचा प्रचार व प्रसार करण्यात अपयशी का झालो?
या प्रश्नाचे उत्तरासाठी आम्ही आजही निरुत्तर का आहोत.?
कारण…….
आज एकविसाव्या शतकातला विशेषतः 2014 नंतरचा भिखूसंघ आणि उपासक वर्ग तसेच समाजातील उच्चभ्रू वर्ग ( जो अनैतिक मार्गाने पैश्याने श्रीमंत झाला )या RSS / मनुवाद्याच्या काव्याला म्हणजेच षडयंत्राला अर्थात मोह,माया, धनाला बळी पडला.ज्या विहारांची निर्मिती,ज्या पुतळ्याची निर्मिती,ज्या स्मारकाची निर्मिती ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंतच्या व्यक्तींच्या घामाच्या योगदानातून निर्माण व्हायला पाहिजे!
त्या ठिकाणी RSS / मनुवाद्यांनी सत्तेच्या बळावर संविधानात ” धर्मनिरपेक्ष ” हा शब्द असताना सुद्धा म्हणजे कोणत्याही धर्मासाठी शासनाच्या तिजोरीतून एक पैसा सुद्धा खर्च करता येत नाही.असे असताना सुद्धा विहारांची,मंदिराची निर्मिती करून,धर्मनिरपेक्षतावादाला अर्थात संविधानाला सुरुंग लावण्याचे काम होत आहे.ते आम्ही आमच्याच धम्मातील आम्हीच खरे वारसदार म्हणणारे बघ्याची भूमिका घेतात.आणि या षडयंत्राला बळी पडतात!
म्हणजेच अडीचहजार वर्षांपूर्वीच्या तथागतांच्या त्या सिद्धांताला काळिमा फासवण्याचे काम आम्हीच करतोय (यात अनंत भवरे पहिला )……!!!!”
हा प्रश्न प्रत्येक आंबेडकरवादी,प्रत्येक धम्मप्रसारक,प्रत्येक बोधाचार्य,प्रत्येक उपासक आणि उपासकांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीला विचारावा (अर्थात ती आपल्याजवळ असेल तर, नसेल तर प्रश्नच नाही म्हणा).आणि त्याचे उत्तर शोधून त्यावर आचरणातून आरुढ व्हावे….
अन्यथा षडयंत्राला बळी पडावे लागेल.मग कांही वर्षांनी आपल्या घरातील भिंतीवरील महापुरुषांचे फोटो गायब होऊन देविदेवतांचे फोटो दिसलें तर नवल वाटायला नको.!
जागृतीचा कृतिशील लेखक..
अनंत केरबाजी भवरे
(संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689)



