Home देशविदेश १२ सप्टेंबरला जनसंवाद पंचशील ध्वज यात्रा पोहोचणार परभणीत… — भन्ते विनाचार्य...

१२ सप्टेंबरला जनसंवाद पंचशील ध्वज यात्रा पोहोचणार परभणीत… — भन्ते विनाचार्य यांच्या सह उपस्थितांचे होणार आदरपूर्वक स्वागत…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक  

    महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भन्ते विनाचार्य यांच्या द्वारा जनसंवाद पंचशील ध्वज यात्रा सुरू आहे.सदर यात्राचे १२ सप्तेंबरला परभणी येथे आगमन होणार आहे.

        परभणी जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिका यांना कळविण्याच येते की,अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे.

       ही लढाई गल्ली ते दिल्ली आणि न्यायालयांपर्यंत आपल्या हक्कातंर्गत,आपल्या अधिकाराला प्राप्त करण्यासाठी सुरू आहे. 

        अनागारिक धम्मपाल यांनी सुरू केलेला हा लढा पुढे पूज्य. भंते सुरेश ससाई नागार्जुन यांनी जिवंत ठेवला.अनेक वर्षानंतर आकाश लामा,भन्ते विनाचार्य,भन्ते केके राहुल,भन्ते सुमित रत्न,यांच्या प्रमुख नेतृत्वात हा लढा पुन्हा सुरू झालाय.पाहता पाहता या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा सुद्धा जाहीर केला.

     महाबोधी महाविहार हा बौद्ध धम्माचा पवित्र धरोहर असून तो. खऱ्या अर्थाने बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा,या पवित्र ध्येयाने भन्ते विनायचार्य संपूर्ण भारतात पदयात्रा करत आहेत. 

       या धम्मयात्रेच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करणे,बौद्धांचा हक्क प्रस्थापित करणे व महाबोधी महाविहाराचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.भन्ते विनाचार्य यांची पंचशील यात्रा परभणी जिल्ह्यांमधून जाणार आहे.

       परभणी जिल्ह्यातील या यात्रेचे विशेष महत्त्व आहे. कारण परभणी हा जिल्हा सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नेहमीच सक्रिय राहिला आहे.या जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी नेहमीच आंदोलनांना पाठिंबा देऊन समाजजागृतीचे कार्य बळकट केले आहे. 

       आज या आंदोलनाला अधिक व्यापक करण्यासाठी व समाजामध्ये बौद्ध धम्माच्या मूल्यांची जागृती निर्माण करण्यासाठी भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली पंचशील धम्मध्वज यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहे. 

        महाबोधी महाविहार मुत्ती लढा अजून तीव्र गतीने करण्यासाठी दिनांकः 12 सप्टेंबर 2025, रोजी परभणी येथे पंचशील धम्मध्वज पदयात्रेचे आयोजन केले आहे. 

        परभणी जिल्ह्यातील सर्व बंधू-भगिनींना या यात्रेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.चला,आपण सारे मिळून आवाज बुलंद करूया आणि धम्म,समता,न्याय व बंधुतेचा संदेश प्रत्येक घरोघरी पोहोचवूया असे आवाहन धम्म ध्वज रॅली आयोजकांनी केले आहे.

       धम्म ध्वज रॅली मार्ग :- महाराणा प्रताप चौक (जेल कॉर्नर) ते सुजाता नगर बुध्द विहार,परभणी असा राहणार आहे.

     संयोजक…

    भदन्त मुदितानंद थेरो (जिल्हाध्यक्ष, आखिल भारतीय भिक्खू संघ, परभणी-हिंगोली),..आहेत.

तर निमंत्रक…

    भारतीय बौध्द महासभा पदाधिकारी-सदस्य,समता सैनिक दल पदाधिकारी-सदस्य,परभणी… आहेत..

    (शुक्रवार दि.12/09/2025 वेळ :- सायं. 4.00 वाजता,स्थळ : सुजाता बुध्द विहार सुजाता नगर,जुना पेडगाव रोड,परभणी.)