रत्‍नाबाई राठी हायस्कूल दर्यापूर येथे गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा…

 

युवराज डोंगरे/खल्लार

   उपसंपादक

    रत्नाबाई राठी हायस्कुल दर्यापूर येथे जन्माष्टमीनिमित्य दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये एकूण तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राधा कृष्णाचा वेश परिधान करून या विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमात दहीहंडी फोडून हा कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा केला.

         यासोबतच दहीहंडी सजावट ही स्पर्धा सुद्धा घेण्यात आली असून त्यामधून तीन क्रमांक काढण्यात आले. या कार्यक्रमा करिता रत्‍नाबाई राठी हायस्कूल दर्यापूरचे मुख्याध्यापक हेमंत शेंडे ज्येष्ठ शिक्षक करडे प्रधान सौ.बुरघाटे सौ.कावडकर, कु.उपासे मॅडम, काळे सर, पाटील सर,शसोळंके सर, कु.काजल खडे आणि महाजन सर यांनी सर्व बालगोपालांचे कौतुक केले.

       तसेच त्यांचा उत्साह वाढवला.वर्ग पाच ते आठ च्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच गोपाळकाला करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.