आळंदी भाजप संघटन सरचिटणीस पदी ज्ञानेश्वर बनसोडे यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : येथील ज्ञानेश्वर बनसोडे यांची आळंदी शहर भारतीय जनता पक्षाच्या संघटन सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे आळंदी शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी सांगितले. ज्ञानेश्वर बनसोडे यांना संघटन सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष किरण येळवंडे, संजय घुंडरे, संदीप सावंत, सचिन गिलबिले, सागर भोसले, पांडुरंग वहीले, भागवत आवटे, बंडुनाना काळे, सचिन काळे, आकाश जोशी, संकेत वाघमारे, सदाशिव साखरे, भागवत काटकर, चारुदत्त प्रसादे, संगिता फपाळ, वासुदेव तुर्की, प्रमोद बाफना, सचिन सोळंकर, सुजीत काशीद तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

          ज्ञानेश्वर बनसोडे यांनी यापूर्वी भाजप ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्षपदी, कर्तव्य फौंडेशनच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. त्यांचे हेच संघटन कौशल्य व पक्ष कार्य पाहून त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, खेड तालुक्याचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख व शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी जो विश्वास माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर दाखवला त्याला न्याय देऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर देणार आहे असे नवनिर्वाचित भाजप शहर संघटन सरचिटणीस ज्ञानेश्वर बनसोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.