माऊली मंदीरात एकपात्री मुक्ताई – एक मुक्ताविष्कार प्रयोग सादर…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

          आळंदी : येथील माऊली मंदीरात संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या माध्यमातून आदिशक्ती मुक्ताई चरीत्र निरुपण सोहळ्यात डॉ.प्रफुल्लता सुरू यांचे संहिता लेखन आणि डॉ.प्रशांत सुरू यांचे दिग्दर्शन असलेला डॉ.प्रचिती सुरू – कुलकर्णी यांचा एकपात्री मुक्ताई – एक मुक्ताविष्कार कृतज्ञापूर्वक सादर करण्यात आला.

             डॉ.प्रचिती सुरू यांनी संत मुक्तबाई यांच्या जीवनाचा अर्थ उलगडून दाखविला. यावेळी माऊली मंदिरात रसिकांच्या उत्तम प्रतिसादानंतर रंगत गेला. श्री संत मुक्तबाई यांचे जीवन चरित्र डॉ.प्रचिती सुरू यांनी दीडतासाच्या नाट्यातून त्या काळातील संत मुक्ताबाई यांचा जीवनपट यातून साकारला होता. 

          यावेळी डॉ.नारायण महाराज जाधव, वैद्य प्रशांत सुरु, प्रकाश काळे, नरहरी महाराज चौधरी, ज्ञानेश्वर वीर, राजाभाऊ चोपदार, श्रीधर सरनाईक, विलास वाघमारे, विश्वभंर पाटील, धनंजय काळे, भारती पवार, निर्मला चव्हाण, सरला न्हावले, संगिता वाघमारे तसेच चरीत्र समितीचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.