ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज :- वाचन म्हणजे जीवनातील प्रगतीचा मार्ग,वाचनामुळे बुद्धिमत्ता अधिक वाढते तसेच मानसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो.
कौंटुबिक,आर्थिक सामाजिक,,भावनिक आणि माणसिक दृष्ट्या व्यक्तिला परिपक्व होण्यास वाचन मदत करते.प्रत्येक ग्रंथ शिकण्यासाठी एक नवीन संधी देत असते.ग्रंथामुळे ज्ञानात भर पडते.
यामुळे युवा पिढीने जास्तीत जास्त वेळ देत ग्रंथालयात यावे व विविध पुस्तकांचे वाचनातंर्गत स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून भरघोस यश प्राप्त करावे.
असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय मध्ये डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम अभ्यासिकेचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर,राठोड,श्रीमती भारती शिवणकर,ॲड.सेख,शंकर पारधी,ग्राम.पं.सदस्य विलास पिलारे,ग्राम.पं.सदस्य दिनेश ठाकरे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज ढोरे,पलटूदास मडावी तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी,पालक वृंद,शिक्षक वृंद आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.