अवकाळे व शर्मा यांचा अखिल महाराष्ट्र शिक्षक संघात जाहीर प्रवेश…

 

युवराज डोंगरे 

उपसंपादक

दर्यापूर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात विनोद अवकाळे व राजेंद्र शर्मा यांनी जाहीर प्रवेश घेऊन दर्यापूर तालुक्यातील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची ताकद वाढविली.

         दर्यापूर शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी विनोद अवकाळे व राजेंद्र शर्मा सर यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दर्यापूर मध्ये जाहीर प्रवेश केला. त्याप्रसंगी समता पॅनलचे अध्यक्ष प्रकाशराव धजेकर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पंडितराव देशमुख रत्नाकर करुले,दिलीप खंडारे,संजय जोशी जिल्हा कार्याध्यक्ष संजय साखरे,शिक्षक सहकारी बँक संचालक संजय नागे डि.आर.जामनिक यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश निश्चित केला. 

पतसंस्था निवडणुकीच्या तोंडावर वरील दोन्हीही ज्येष्ठ बंधूंचे प्रवेश विशेष महत्त्वाचे असल्याचे दिसून येते.

       याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास अनिलभाऊ रुद्रकार,राजेंद्रजी मालोकार,विजय पवार ,सुरेंद्र पतिंगे,विलास पेठे ,सतीश वानखडे,राजेंद्र सावरकर,धनराज साखरे,अरुणभाऊ चव्हाण,अशोकराव बावनेर,बाळकृष्ण पावडे, गजानन गनोदे, प्रमोद कुरळकर, प्रशांत गहले, दिनेश देशमुख, कैलास डहाळे, सुनील स्वर्गीय, कु.अर्चना वाटाणे, कु.सुवर्णा ढोरे , विनायकराव चव्हाण ,सतीश नांदणे, भारत माहुरे,सुरेश धांडगे,मधुकर चव्हाण,विजय ठाकरे, प्रफुल्ल बिजवे,हरिदास ठाकरे,संजय कळसकर,गजेंद्र बावनेर,रवींद्र झाकर्डे, रावसाहेब होले,अशोक गावंडे,धनराज चांदुरकर,दिनेश मंडवे,प्रदीप रुपनारायण,बाळासाहेब रायबोले,चरणदास कोलटक्के, वासुदेव मेमनकर,संतोष पवार,मंगेश ब्रम्हखेडे,धरमदास चव्हाण,प्रभाकर कडू,सौ सारिका पवार,सौ.शिला जामनिक,सौ भारती पेठे, सौ.वैशाली चांदुरकर,सीमा पातुर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.