पाच तालुक्यांकरीता उपकोषागार कार्यालय अहेरी येथे वेतन निश्चिती प्रकरणांची पडताळणी करणेसाठी शिबीराचे आयोजन..

 

डॉ.जगदिश वेन्नम

      संपादक 

गडचिरोली,(जिमाका)दि.07: उपकोषागार कार्यालय, अहेरी येथे, दिनांक 12 जुन 2023 ते 16 जुन 2023 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाच तालुक्यांतर्गत येणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे कडील माहे मे 2024 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे सेवापुस्तक पडताळणी करणेकरीता वेतन पडताळणी पथक, नागपूर यांचे द्वारे शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

           सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी त्यांचे कार्यालयातील माहे मे 2024 पर्यंत सेवानिवृत्त होणारे सर्व अधिकारी व कर्मचारी, मयत, गंभीर आजार असणारे, विभागीय चौकशी वगळता तात्पुरते निवृत्तीवेतन घेणारे यांचे सेवापुस्तक पडताळणी प्रलंबित असल्यास ती पुर्ण करुन घ्यावी. सेवा पुस्तके वेतन निश्चिती पडताळणी करीता वेतनीका प्रणाली मधुनच सादर करणे बंधनकारक आहे. सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाचही तालुक्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वरील सुचनांचे काटेकोर पालन करावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.