Home Social संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदीर जागतिक पातळीवर नेणार :- महेंद्र के.महाजन… —...

संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदीर जागतिक पातळीवर नेणार :- महेंद्र के.महाजन… — विश्वस्त मंडळ व आळंदीकर ग्रामस्थांचे महाजन यांनी केले कौतुक…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : महाराष्ट्रात पंढरपूर, शिर्डी, शेगाव, सिध्दीविनायक देवस्थानच्या यादीत आळंदीला बसविण्यासाठी अजूनही सुखसुविधांची कमतरता आहे येथे राहण्याची, जेवणाची व्यवस्था नाही परंतु आता देवस्थानचे सहाही विश्वस्त आणि मी स्वतः आळंदीचा व देवस्थानचा कायापालट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून माऊलींचे मंदीर हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने जागतिक पातळीवर नेणार असल्याचे आश्वासन पुणे जिल्हा न्यायाधीश तथा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष महेंद्र के.महाजन यांनी दिले.

       संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सव निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष महेंद्र के.महाजन यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, डॉ.भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहीणी पवार, वारकरी शिक्षण संस्थेचे शांतीब्रमह मारुती महाराज कुऱ्हेकर, किर्तनकार हभप पांडुरंग महाराज घुले, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.

       संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष महेंद्र के.महाजन माझे आजोबा पंढरपूरची वारी करत असत वारी वरुन ते आम्हाला काळा गंडा, साखर फुटाणे आनत तो काळा गंडा हातात घालत साखर फुटाणे खात आम्हाला पंढरीचे व विठ्ठलाचे दर्शन होत, आमच्या आजोबांनी जे हरीनाम घेतले त्याचे पुण्याचे फळ मला मिळाले आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० जन्मोत्सव आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहोत याचे सर्व श्रेय सर्व विश्वस्त मंडळ व आळंदीकर ग्रामस्थ यांना जात आहे.

         आळंदीच्या विश्वस्त मंडळात दोन गावकऱ्यांचा समावेश करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ती पूर्ण केली. तसेच, संस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला विश्वस्ताची नेमणूक करून त्यांनी सामाजिक समावेशकतेचा दृष्टिकोन दाखवला.