शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
पळसगांव(पि):-चिमूर तालुक्यातील मौजा पळसगांव येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात व प्रसंन्न वातावरणात साजरी करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत भगवान गौतम बुद्ध व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी पळसगांव येथील सरपंच सरिता गुरुनुले,उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,ग्रामपंचायत सदस्य तथा रोजगार हमी कामगार वेल्फेअर संघटनेचे अध्यक्ष प्रदिप गजभिये,पोलीस पाटील रागिना दडमल,अखिल भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष दामोदर रामटेके,अखिल भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष कैलास खोब्रागडे,सचिव संजय जुमडे,महामाया महिला मंडळच्या अध्यक्षा जयवंता रामटेके,सचिव लता खोब्रागडे,हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी मातोश्री रमाई यांच्या विशाल संघर्षमय जिवन कार्यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला.
माता रमाई यांच्या जयंती दिनानिमित्त गावातील प्रतिष्ठित नागरिक संपत येसनसुरे,गावातील नागरिक व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



