ईव्हीएम विरोधात वकिलांचा मूकमोर्चा.. — चंद्रपूर जिल्हा सतर्क..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादिका

चंद्रपूर :-

        ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका विश्वासार्ह व भयमुक्त नसल्याचे वास्तव वारंवार पुढे आले.ईव्हीएम मशीन म्हणजे एक षडयंत्र व धोका असून बहुजन समाजातील नागरिकांच्या अधिकार व हक्कांना प्रभावहीन करीत आहे.

          यामुळे भारत देशातील नागरिकांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात बंड पुकारले असून देशभरात ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलने होत आहेत.

       तद्वतच मतपत्रिका द्वारा सर्व प्रकारच्या निवडणूका व्हाव्यात हे प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आली आहे.याच अनुषंगाने ईव्हीएम मशीन विरोधात चंद्रपूर जिल्हातंर्गत अधिवक्त्यांनी मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी नेलाय.

          संविधानाने मतदारांना दिलेल्या बहुमूल्य मताचा योग्य वापर व्हावा,लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात यासाठी ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी,सर्व निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरने घ्याव्यात या मागणीला घेऊन चंद्रपूरमध्ये अधिवत्यांतर्फे सोमवार दि.५ फेब्रुवारीरोजी मोर्चा काढण्यात आला. 

       न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती तसेच केंद्रीय निवडणूक आयुक्तांना निवेदन पाठविण्यात आले.

    या मोर्चामध्ये अँड.दत्ता हजारे,अँड.भीमराव रामटेके,एड.पुनमचंद वाकडे,एड.झेड के खान,एड. पी.एम. आवारी,एड.शरद आंबटकर,एड.जयंत साळवे,एड. वैशाली टोंगे,एड.फरहान बेग,एड.शंकरराव सागोरे,एड. प्रशांत सोनुले यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने वकिलांनी मूकमोर्चामध्ये सहभाग घेतला होता.