माॅसाहेब मीना ताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त शेकडो शिवसैनिकांनी केले अभिवादन.

      राकेश चव्हाण

 कुरखेडा तालुका प्रतिनिधी

        कुरखेडा येथील शिवसेना कार्यालयात शिवसैनिकाच्या माऊली माॅसाहेब मीनाताई ठाकरे यांची जयंती शिवसैनिकांच्या उपस्थितीत साजरी कण्यात आली.

         या प्रसंगी सर्व प्रथम माॅसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल,उपजिल्हा प्रमुख महेन्द्र कुमार मोहबंसी,तालुका प्रमुख- नगरसेवक आशिष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

           या नंतर उपस्थित शिवसैनिकांनी माॅसाहेबाना अभिवादन केले.या प्रसंगी माजी नगरसेवक पुंडलीक देशमुख,शहर प्रमुख संजय देशमुख,माजी शहर प्रमुख विजय पुस्तोडे,कालू चंदनखेडे,बजरंग बैस, सुनील नेवारे,देविंद्र मेश्राम,चंदू नाकतोडे,तुळशीराम बुरबांधे,बळीराम गुंडरे,सुरज मसराम,उदव पाटील खुणे,राजूनंदनवार,शैलेश कोटांगले,मनोज नेवारे,मोहिनी पठाण व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.