निरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यात थंड हवामान आसल्याने गहु पीक जोमात, शेतकरी चिंतादूर….

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर परिसरातील गव्हाची पिके थंड हवामान आसल्यामुळे जोमात आलेली आहेत. 

          निरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यामध्ये गहू पिकासाठी थंड व पोषक हवामान आहे. गहू पीक हे दर्जेदार उत्तम प्रकारे आल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.

         पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये दोन नद्यांचा पट्टा हा ऊस उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जाणारा भाग आहे. या भागात ऊसा सोबतच गव्हाच्या पिकाचा सहभाग नेहमीच असतो. 

            त्यापैकी गव्हाची पिके अतिशय जोमात आल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.

          चांगल्या प्रतीच्या गहू बियाण्याची लागवड शेतामध्ये करून अतिशय उत्कृष्ट रित्या पीक चांगले आले आहे. पर एकरी वीस ते पंचवीस क्विंटल गव्हाचे उत्पन्न होणार असल्यामुळे अधिक लक्ष शेतामध्ये उत्पन्न काढण्यासाठी लागले आहे.

           या परिसरातील 25% शेतकऱ्याने गहू पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे.तर इतर अनेक शेतकऱ्याने ऊसा सहीत आनेक पिके शेतामध्ये घेतलेली आहेत.

       चांगल्या प्रतीचे गहु पीक आणले. तरच शेतकऱ्याची बाजू मजबूत राहील. शेतकरी वर्गावर अडचणीचे संकट निर्माण झालेले आहे. 

          पावसाळ्यात गारपिटीचे संकट उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतीचे संकट तर थंडीच्या दिवसात धोक्यामुळे पिकावर होणारा परिणाम आसे वेगवेगळे संकट शेतकऱ्यावर येतच आहे.तर या भागातील सर्व शेतकरी मेठा कुटीला आलेला आहे. संपूर्ण क्षेत्रावरील कर्ज माफी करून 7/12 उतारा कोरा करण्यासाठी शेतकरी राजा वाट पाहत आहे.