YES मेसेज पाठविणाऱ्या सन्माननीय सर्वसामान्य भारतीय संविधाननिष्ठ नागरिकांसाठी आवाहन….. — बेधडक असा अग्रलेख उज्ज्वल भविष्यासाठी.. ( महत्वपूर्ण अग्रलेख:- दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे मुख्य संपादक यांच्या सुचनेनुसार प्रकाशित..)

          मी गेल्या आठ दिवसापूर्वी माझ्याकडील असलेल्या 130 व्हाट्सअप गृपवर या आवाहनाविषयी पोस्ट टाकली होती. त्यामधून 72 लोकांनी YES मॅसेज माझ्या मो. नं. वर मला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार…..

      म्हणूनच आपल्या सदसदविवेक बुद्धीला मी हे आवाहन करत आहे…. 

       या विश्वात प्राचीन काळापासून क्रांती आणि प्रतीक्रांतीची साखळी एकात एक कड्या असल्याप्रमाणे इतिहासात प्रवास करत आहेत. या प्रवासात क्रांतीचा काळ हा अल्प आहे तर प्रतीक्रांतीचा काळ हा दीर्घकालीन आहे. क्रांती ही सदसदविवेक बुद्धीने प्रेरित होऊन……

— विवेकवाद + विज्ञानवाद = मानवतावाद..

    या तत्वज्ञानावर आधारित जगातील सर्वच महापुरुषांनी क्रांती केलेली असते.याउलट प्रतीक्रांती ही साम,दाम,दंड आणि भेदाच्या कुटनीतीवर आधारित असते. जिच्यामुळे मानव हा दानव बनतो आणि विश्वात मानवता लयास जाते.

           पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी जगाच्या पाठीवर सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून भारत देशात आणि ग्रीक संस्कृतीच्या माध्यमातून ग्रीक देशात केवळ या दोनच देशात लोकशाहीवादी शासन प्रणाली 100% अविष्कारीत झालेली होती.जी लोकशाही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि नैसर्गिक न्यायावर आधारित असते.

   हे ऐतिहासिक पुराव्यानुसार सिद्ध झालेले आहे.

         परंतू ,या भारत देशावर आर्य लोकांनी कूटनितीने राजकीय आणि कुसांस्कृतिक आक्रमण केल्यामुळे, त्याचप्रमाणे ग्रीकवर सोफेस्टिकेटेड ( आर्य ) लोकांनी कुसांस्कृतिक व राजकीय आक्रमण केल्यामुळे दोन्ही देशातील मानवतेवर आणि लोकशाहीवर घाव घालून कायमचे नष्ट केले.

     हा प्रतीक्रांतीचा पहिला घाव ठरला.त्यानंतर पुन्हा भारत देशात तथागत भगवान बुद्धानी एकट्याने या प्रतीक्रांतीला पहिला शह दिला ते धम्माचे संशोधन करून…!

     त्यानंतर तथागत भगवान बुद्धाच्या महपरिनिर्वाणानंतर 10 वर्षांनी जन्मलेल्या सॉक्रेटीसने ग्रीकमध्ये प्रतीक्रांतीला शह देऊन क्रांती करून लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.

    म्हणूनच…….

      तत्वज्ञानाशिवाय शील नाही,शीलाशिवाय सत्य नाही, सत्याशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय विज्ञान नाही, विज्ञानाशिवाय तंत्रज्ञान नाही, तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नाही, प्रगतीशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय आपल्याला गत्यनंतर नाही……!

     म्हणून शांतीचा दूत असलेले…..

     तथागत भगवान बुद्ध 

               आणि

तत्वज्ञानाचे दूत असलेले….

   सॉक्रेटीस..

   या दोन महापुरुषांनी जगावर फार मोठे उपकार प्राचीन काळात मानवतेवर केले. परंतू जग त्यांनाच विसरले…..!

        पुढील काळात त्यांनी मांडलेल्या नैसर्गिक नियमावर आधारित असलेला धम्म आणि तत्वज्ञानच संपूर्ण विश्वाला तारू शकते हे सिद्ध झाले….     

         परंतू ,या दोन्ही महापुरुषांच्या नंतर पुन्हा एकदा प्रतीक्रांतीची लाट आली आणि लोकशाही व मानवता पुन्हा कलंकित झाली. आपल्या देशात तर सम्राट अशोक, सम्राट कनिष्क आणि सम्राट हर्षवर्धन यांनी बुद्ध धम्माला म्हणजेच मानवतेला राजाश्रय देऊन लोकशाही मूल्यांना व मानवतेला पुनरुजीवित करण्याचा प्रयत्न केला.

     परंतू ,ते फार काळ टिकू शकले नाही.आणि पुन्हा एकदा पुष्यमित्र शून्गाने कुटनीतीने प्रतीक्रांती करून क्रांतीला शह दिला….. 

       जवळपास साढेतेराशे वर्षे हा भारत देश वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय व कुसांस्कृतिक आक्रमणामध्ये बुडून गेला…..

     आणि मानवता,लोकशाही आणि तीची मूल्य कायमची लयास गेली….!

      अधून मधून संत कबीर त्यानंतर आलेल्या वारकरी संप्रदायाने या कुटनीतीला शह देण्याचा प्रयत्न केला, परंतू तो अपुरा पडला.

“कारण..

       कुटनीतीची मुळे फार खोलवर येथील ब्राम्हणांनी रुजवली होती. तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर या देशात लोकशाही मूल्य रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार समजून स्त्री आणि शूद्रांना शिक्षणाची द्वारे खुली केली.छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात करून समतेची लाट आणली.

     परंतू तरी सुद्धा कुटनीतीला म्हणजेच प्रतीक्रांतीला शह देऊन तीला कायमचे पराभूत करण्यासाठी हे प्रयत्न अपुरे पडले………!

      “जेव्हा एखाद्याच्या मनात निःस्वार्थपणे विश्वाचे कल्याण करण्यासाठी एखादा मुलमंत्र सुचतो आणि त्यानुसार तो व्यक्ती लोकांना जागृत करतो, आणि ही जागृती करत असतांना तो जर शरीराने संपला……..

     तर एक दिवस तोच विचार कालांतराने कुणाच्यातरी डोक्यात येतो आणि ते अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यास पात्र ठरतो. “

    — थॉमस अल्वा एडिसन

     वरील थॉमस अल्वा एडिसनचे तत्वज्ञान म.फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत खरे ठरले.

       जेंव्हा लेखन करता करता उजव्या हाताला लकवा आला असता डाव्या हाताने लिहिण्याचा सराव म. फुले यांनी केला. शेवटी उर्वरित क्रांती माझ्यानंतर कुणीतरी येऊन करेल म्हणून 1890 मध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर लगेच 1891 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.

    आणि थॉमस अल्वा एडिसनचे तत्वज्ञान खरे ठरले…. 

      सुमारे सम्राट हर्षवर्धनाच्यानंतर साढे तेराशे वर्षानी प्रतीक्रांतीला ( कुटनीतीला ) पूर्णपणे कायमचे पराभूत करून या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला लोकशाही आणि मानवतेला पुनरुजीवित करण्याचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे संविधान निर्मून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले….

      परंतू संविधान हे आरक्षणासाठीच आणि विशिष्ट समाजासाठीच निर्माण केले असा बहुजन समाजाचा गैरसमज इतरांनी केल्यामुळे संविधानाला समजून घेण्याची कुणी तसदी घेतलीच नाही. म्हणून गेल्या 75 वर्षाच्या इतिहासात आम्ही ( भारतीय जनता ) संविधान जागृतीपासून वंचित ठरलो……!

     संविधानातील 395 कोहिनुर हिऱ्यापैकी केवळ दोनच हिऱ्यांचे विश्लेषण मी वेळेअभावी करत आहे,त्यावरून लक्षात येईल की संविधान हे जाती धर्मात किंवा राजकारणात अडकले नसून मानवाच्या कल्याणासाठीच आहे. हे सिद्ध होते.

       उदा.अनुच्छेद क्रमांक 47 नुसार केंद्र व राज्य सरकारांनी अल्कोहोलची निर्मिती केवळ आणि केवळ औषधी निर्मितीपुरतीच केली पाहिजे, त्यापेक्षा एक अंशही जास्त नको.

       अनुच्छेद क्रमांक 48 नुसार शेतकऱ्यांनी दुधाची निर्मिती जास्तीत जास्त केली पाहिजे.

     वरील दोन्ही अनुच्छेदाचा संविधानात समावेश करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काय साध्य केले?

      याचा अर्थ स्पष्ट आहे की, प्रत्येकाच्या हृदयातील सदसदविवेक बुद्धीला नष्ट करण्याचे काम सर्वच प्रकारच्या मादक पदार्थाच्या सेवनामुळे होते म्हणून 47 क्रमांकाच्या अनुच्च्छेदाचा समावेश….!

        आणि दुधापासून बनणाऱ्या सर्वच पदार्थाच्या सेवनामुळे प्रत्येकाला आरोग्य लाभते. म्हणजेच सदसदविवेक बुद्धी जागृत होऊन माणूस हक्कासाठी जागृत होऊन गुलाम होऊ शकत नाही. म्हणजेच संविधान, लोकशाही मूल्ये जिवंत राहतील.

      म्हणजेच गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्याची गरजच पडत नाही……!

    या दोनच संविधानातील कलमाचा अर्थ मी या ठिकाणी सांगितला. मला सांगा शेतकरी कोण्या एका धर्माचा व जातीचा आहे का….?

        दारू आणि इतर मादक पदार्थाचे सेवन करणारी जनता कोणत्या एका धर्माची व जातीची आहे…..?

        या प्रश्नाचे उत्तर म्हणजे भारतीय संविधान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे…..

      आणि हेच संविधान,लोकशाही,लोकशाही मूल्ये ( स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ) व देश गेल्या 75 वर्षात आपण ( भारतीय जनता ) संविधानातून जागृत न झाल्यामुळेच……..

      पुन्हा एकदा केवळ 75 वर्षात कुटनीतीच्या म्हणजेच प्रतीक्रांतीच्या (RSS ) च्या गुलामीत जात आहोत……!

    आणि या गुलामीचा वेग कोरोनाच्या गतीने 2014 पासून वाढलेला आहे.

       देशातील कायदेमंडळ ( लोकसभा व राज्यसभा ) मोदीने ( RSS) ने EVM+VVPAT च्या बळावर ताब्यात घेतले आहे………!

     राष्ट्रपती त्यांच्याच सोईचे गुलाम आहेत…..!

    मुख्य निवडणूक आयोग ( आयुक्त )त्यांचेच गुलाम झाले आहे….!

       सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा ब्राम्हण असल्यामुळे त्यांच्यावरही विश्वास ठेऊ शकत नाही…..!

       एकंदर लोकशाहीतील सर्वच जबाबदार घटकांवर कुटनीतीने प्रतीक्रांतीचे पाऊल उचलले आहे………..!

          अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला,आम्हाला सर्वांना दिलेला एकच संदेश लागू पडतो, तो म्हणजे……

   “गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत,…..

        —– युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर

       या शेवटच्याच संदेशाला धरून मी आपल्याला आवाहन करत आहे………..

        मी गेल्यावर्षी ( 2022 मध्ये ) याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यात संविधान जनजागरण रॅली काढली होती.

       आता मात्र त्याच संविधान जनजागरण रॅलीच्या नावाने परंतु प्रबोधनातून मात्र EVM + VVPAT हटाव आणि बॅलेट पेपर लाव, संविधान बचाव, लोकशाही आणि देश बचाव हीच जागृती संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहोत….. 

         परंतू मी तन,मन आणि देता येऊ शकेल तेव्हढे धन देऊ शकतो. परंतू मी अपुरा पडतो. गेल्यावर्षी अडीच लाखाचे रॅलीचे बजेट होते. आपल्यासारख्याच्या सहकार्याने ते मी पूर्ण केले. परंतू यावर्षी छोटी मिनी बस करतोय, 10,000पत्रके, 10,000 पुस्तिका ( छोट्याश्या ), गाडीची बॅनरणे सजावट, सोबत 8 ते 10 माणसं, त्यांच्या जेवण आणि इतर खर्च, तसेच गाडीचे डिझेल, गाडीचे भाडे, साधारण सर्व खर्च अंदाजे सहा लाखाचा खर्च आहे…..!

       जर आपण ज्यानी ज्यांनी YES मेसेज मला पाठवला अशा 72 जणानी स्वतःसोबत इतर नातेवाईक, मित्रमंडळी, दानशूर व्यक्तीकडून, ही पोस्ट त्यांना पाठवून, त्यांच्या सहकार्याने 10/01 / 2024 पर्यंतच्या मुद्दतीत YES मेसेज पाठवणाऱ्या प्रत्येकाने जर 5000/- रुपयाची सार्वजनिक जबाबदारी घेऊन माझ्या फोनपे नंबर (7875452689 ) वर पाठवली आणि त्याचा स्क्रीन शॉट जर पाठवला तर निश्चितपणे हा प्रतीक्रांतीचा डाव आपण हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही……

10 तारखेपर्यंतच का म्हणतो……

          कारण 22 तारखेला राममंदिराचे उदघाटन झाल्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटी कधीही आचारसंहिता लागू केली तर आपली रॅली शक्य नसेल….

      शिवाय गाडीची सजावट, पत्रके छापणे,पोलीस महासंचालकांची महाराष्ट्रभर पोलीस परवानगी यासाठी वेळ आणि पॆसे लागणार आहेत…….

         म्हणून 10 तारखेपर्यंतच जीवनातील शेवटची संधी म्हणून प्रत्येकाने आपल्या नातवाच्या मुलाच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नपुरतीसाठी केवळ 5000/- रुपयाचे योगदान देऊनच थांबायचे नाही तर…….

         रॅली जेंव्हा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येईल तेंव्हा जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन EVM +VVPAT कायमचे हटविण्यासाठी उपस्थित राहावे..

 

(वरील विषयाला अनुसरून काही शंका प्रश्न असतील तर जरूर फोन करून चौकशी करावी )….

             आवाहनकर्ता

        अनंत केरबाजी भवरे 

( संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,संपर्क क्रमांक 7875452689 )