अवैध उत्खनन करणाऱ्यांनी चिमूर तालुक्यातील गौण खनिज संपदेची केली मोठ्या प्रमाणात चोरी… — चंद्रपूर जिल्हाधिकारी लक्ष देतील काय? — करोडो रुपयांचा महसूल बुडविल्या जात आहे… — उपजिविकेसाठी अवैध उत्खनन सर्व नागरिकांनी करायचे काय? — काय म्हणावे? — हिवाळी अधिवेशन/लक्षवेधक…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

              चिमूर तालुका गौण खनिज चोरीसाठी प्रशिध्द झाला असून या तालुक्यात केव्हाही मुरुमाचे व वाळूचे अवैध उत्खनन करुन कुणीही धनसंपदा कमाऊ शकतो व महसूल बुडवून मालामाल होऊ शकतो,अशा प्रकारची विचित्र कार्यपद्धत इथे सुरु झाली असून,बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय दुसरे काही करता येत नसल्याचे गंभीर हाल चिमूरच्या स्थानिक प्रशासनाचे झाले आहेत.

           चिमूर तालुक्यातंर्गत मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे अवैध उत्खनन सर्रासपणे होत असून याकडे स्थानिक जबाबदार प्रशासनाकडून का म्हणून कानाडोळा केला जातो?यांचे गुपिते चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा हे बाहेर पाडतील काय? आणि करोडो रुपयांचा बुडविल्या जात असलेला महसूल ते वाचवतील काय?हा प्रश्न सुध्दा भयंकर गहण असाच आहे.

             मागील ७ वर्षांपासून चिमूर तालुक्यातंर्गत मुरुम व वाळू अवैध उत्खननाची कार्यपद्धत मोठ्या प्रमाणात सुरु आहे.मुरुम व वाळू चोरांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याचे नाकारता येत नाही.

        म्हणूनच चिमूर तालुक्यातील सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी हे प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाळू व मुरुमाच्या अवैध उत्खननाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात हे लपून राहिलेले नाही.

             सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली वाळू व मुरुमाच्या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष केले जात असेल तर सर्व सामान्य नागरिकांनी खुल्लमखुल्ला वाळू व मुरुमाचे अवैध उत्खनन करुन आपली बेरोजगारी दूर का म्हणून करु नये?व आपल्या उपजिविकेची मुलभूत गरज का म्हणून भागवू नये?हा मुद्दा पुढे येतोच..आणि अतिशय महत्त्वाचाच हा मुद्दा असल्याने या मुद्याला अनुसरून जनमानसात व शासनस्तरावर चर्चा होणे गरजेचे आहे….