Home Maharashtra नागपूर येथील संविधान चौकात महसूल सेवकांचा संप सुरूच… — आमरण उपोषण...

नागपूर येथील संविधान चौकात महसूल सेवकांचा संप सुरूच… — आमरण उपोषण सुरु,महसूल प्रशासनाची दमछाक!

भाविकदास करमनकर

तालुका प्रतिनिधी धानोरा…

 गडलिरोली, (ता.प्र). धानोरा जिल्ह्यात जनता व महसूल प्रशासनामधील महत्त्वाचा घटक असलेले महसूल सेवक दिनांक 13 सप्टेंबर पासुन संपावर असल्याने जिल्ह्यात महसुल विषयक कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. 

         अनेक शासकीय योजना ग्रामिण भागात राबविण्यात येत आहेत.विविध शासकिय योजनांची माहिती जनतेपर्यंत तळागाळात पोहचविण्याची महत्त्वाची भूमिका महसूल सेवक बजावत असतो.

         मात्र चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा यासाठी ते गेल्या 22 दिवसापासुन संविधान चौक, नागपूर. येथे साखळी उपोषण करीत असल्याने प्रशासनाला मोठी दमछाक करावी लागत आहे.

           परंतु शासनाने अद्यापही त्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही.शासनातर्फे दखल न घेतल्याने येत्या ४ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण महसूल सेवकांनी पुकारले आहे.ग्रामस्तरावर गेल्या ६० ते ७० वर्षापासून प्रामाणिकपणे महसूल सेवक काम करीत आहे. तुटपुंज्या वाढीव मानधनावर त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे.अजूनही चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाला नाही.   

        चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा,अन्यथा ४ ऑक्टोबरपासून विदर्भातील सर्व महसूल सेवक संविधान चौक, नागपूर येथे आमरण उपोषण पुकारतील, असा इशारा लेखी निवदेनाव्दारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विदर्भ महसूल सेवक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

       आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.४ ऑक्टोबरला संविधान चौक,नागपूर येथे होणाऱ्या महसूल सेवकांच्या आमरण उपोषणास यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महसुलसेवक सहभागी झाले आहेत.

         शासनानेही आमची चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करून “नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना शासणाकडुन देन्यात येणारी मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी महसुल सेवकांचे योगदान महत्वाचे आहे.शासनाने महसुल सेवकांना चतुर्थश्रेणी देऊन शासनाची व जनतेची सेवा करन्याची संधी द्यावी.”असे श्री-आशिष पोरेटी महसूल सेवक तालुका अध्यक्ष धानोरा यांनी म्हटले आहे.

        सद्या महत्वाचे म्हणजे सतत होणार्‍या पावसामुळे पिक पंचनामे करणे सुरू आहेत,या पिक पंचनामावर महसूल सेवकांच्या आंदोलनामुळे परिणाम पडत असल्याचे दिसून येते आहे.

          सदर आंदोलन काळात यवतमाळ जिल्ह्यासह संपुर्ण राज्यातील सर्व महसूल सेवक हे सहभागी झाले असून त्यामुळे गावस्तरावरील digital crop ई-पिक पाहणी करताना अडचणी येत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी लागणारी कागदपञे जसे की,उत्पन्नाचा दाखला, non creamy layer दाखला व यावर्षी अतिवृष्ठी झाल्यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांना गावपातळीवर शेत सर्वेक्षणाचे काम करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.

     शेतकर्‍यांची शासकिय अनुदानासाठी कागदपञे गोळा करणे.ग्राम महसुल अधिकार्‍यांना अनुदानाच्या याद्या बनविन्यासाठी मदत करणे, शेतकर्‍यांना उपयोगी सातबारा, आठ-अ, फेरफार वितरित करताना महसुल सेवकांची मोलाची मदत होते.

     महसुल सेवक संपावर असल्यामुळे गावातील सामान्य माणसाला सुध्दा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शासनाने महसूल सेवकाच्या संपावरील तोडगा काढून त्यांना वरिल कामे करन्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधव, सामान्य जनतेकडून केली जात आहे.